आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिवृष्टीचा फटका:नांदगावमध्ये 17,977 हेक्टरवरील पिके पाण्यात, शेतकरी मेटाकुटीला; सरकारकडून मदतीची अपेक्षा

प्रतिनिधी । नांदगाव13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
सततच्या पावसामुळे शेतजमिनीची अशी विचित्र स्थिती झाली आहे. - Divya Marathi
सततच्या पावसामुळे शेतजमिनीची अशी विचित्र स्थिती झाली आहे.

यावर्षी जुनमधे पावसाने उघडीप दिली. मात्र, जुलैमध्ये झालेली संततधार व अतिवृष्टीचा फटका नांदगाव तालुक्यालासुद्धा बसला. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार तालुक्यातील 17 हजार 977 हेक्टरमधील पिके अतिवृष्टीने बाधित झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे.

शेतात पाणी, पिके सडली

जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यालीन नदी नाल्याकाठच्या शेतातील पिके पुरामुळे खरडून गेली. तर, काही शेतामधे अजूनही पाणी साचून असल्यामुळे पिके सड‌ली आहेत. अतिवृष्टिचा सर्वात जास्त फटका तुर पिकास बसला असून ७० टक्के क्षेत्रातील तूरीचे पिक वाहून गेले. सततच्या पावसाने शेतातील पिकांची वाढ खुंटलेली असुन निंदन, डवरणी होत नसल्याने पिकात तणाचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे निंदण करण्यास मजूर मिळत नाही आणि मजुरीचे दर वाढल्याने शेतकरी तणनाशकास प्राधान्य देत असून काही शेतकरी तणनाशकाची पिकामधे डबल फवारणी करीत आहेत.

शेतकरी मेटाकुटीस

जुलै महिन्यातील सततच्या पावसामुळे काही शेतात शेततळे निर्माण झाले. जमिनी ओल्याच असल्याने डवरणीची कामेही खोळंबली. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला असून शेती करायची की सोडून द्यायची अशी द्विधा मनस्थिती तयार झाली आहे. तालुका कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार नांदगाव खंडेश्वर तालुक्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टिने बाधित आलेले पिक निहाय क्षेत्र सोयाबीन १३ हजार ४२६ हेक्टर तर, तूर २ हजार ५५० हेक्टर, कापूस २ हजार १ हेक्टर असे एकूण बाधित क्षेत्र १७ हजार ९७७ हेक्टरवर पोहचले आहे. त्यामुळेच शासनाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...