आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती:ॲपवरून झालेल्या घनिष्ट मैत्रीतून विवाहितेवर युवकाचा अत्याचार, गुन्हा दाखल

अमरावतीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील एका विवाहितेची अकोल्यातील एका २७ वर्षीय युवकासोबत सहा महिन्यांपूर्वी ॲपवर ऑनलाइन ओळख झाली. त्यांच्यात बोलचाल सुरू झाली आणि घट्ट मैत्री झाली. त्यानंतर त्याने विवाहितेला सुखी ठेवण्याचे आमिष देवून वारंवार अत्याचार केला. विवाहितेने प्रतिकार केला तर धमकीसुद्धा त्याने दिल्याचा तक्रारीत उल्लेख केला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी युवकाविरुद्ध बलात्काराच्या कलमान्वये गुरुवारी (दि. ६) उशिरा रात्री गुन्हा दाखल केला आहे.

नीलेश पळसपगार (२७, रा. कान्हेरी सरप, भवानीनगर, अकोला) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार, पीडीत महिलेचे २०१४ मध्ये दुसरे लग्न झाले आहे. तसेच पहिल्या पती पासून तिला नऊ वर्षांचा मुलगा आहे. दरम्यान १ मे २०२१ ला महिलेची एका ऑनलाइन अॅपच्या माध्यमातून नीलेश नामक अकोल्यातील युवकासोबत ओळख झाली. त्यानंतर पीडीत महिला व नीलेश यांच्यात मोबाइलवरून सतत बाेलचाल सुरू झाली. यातूनच त्यांची ‘घट्ट’ मैत्री झाली. भेटीगाठी सुरू झाल्यात. दरम्यान, एखाद्यावेळी पीडीता त्याला भेटायला गेली नाही तर तो धमकी द्यायचा.

जून २०२१ मध्ये नीलेश अकोल्यातून या महिलेला भेटण्यासाठी अमरावतीत आला. त्यानंतर पीडितेला घेऊन हर्षराज कॉलनीतील एका घरी गेला. ज्या घरी हे दोघेही गेले होते, तो घरमालक बाहेरगावी गेला होता. त्याठिकाणी सुमारे पाच ते सहा तास ते थांबले. त्यानंतर नीलेशने महिलेला शरीरसुखाची मागणी केली. मात्र, पीडिताने मी विवाहित आहे, असे करु शकत नाही, असे म्हणून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी नीलेशने सुखी ठेवण्याचे आमिष देवून आपल्यावर बलात्कार केला. त्यानंतर नेहमीच तो अमरावतीत येऊन भेटायचा, त्याच घरी नेऊन दोन ते तीनवेळा त्याने जबरीने शोषण केले. मात्र, त्याच्या अशा वर्तनामुळे पीडितेने त्याच्यासोबत बोलणे टाळले तर तो धमक्या देऊ लागला. त्यामुळे पिडीतेने हा प्रकार तिच्या पतीला सांगितला. त्यावेळी त्याने जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार पीडीत विवाहितेने गाडगेनगर पोलिसात दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी नीलेशविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...