आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव दाम्पत्यासह 21 वऱ्हाड्यांनी केला अवयवदानाचा संकल्प:सामाजिक बांधिलकी जोपासत केली सहजीवनाची सुरूवात

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अचलपूर तालुक्यातील काकडा येथील निवासी पवन बोंडे व चांदूर बाजार येथील शिवाणी भटकर हे दोघेही विवाह बंधनात अडकले. मात्र त्यांनी आपल्या सहजीवनाची सुरुवात सामाजिक बांधिलकी जोपासत अवयवदानाचा संकल्प करून केली. इतकेच नव्हे, तर लग्नाला आलेल्या 21 पाहुण्यांनीही अवयवदानाचा संकल्प करीत एक नवा पायंडा घातला.

घांटजी येथे तलाठी पदावर असणाऱ्या पवनचा शिवाणीसोबत विवाह पार पडला. लग्नानंतर परवाडा येथे आयोजित स्वागत समारंभामध्ये या नवदाम्पत्याने सामाजिक बांधिलकी जाोपसत अवयवदानाचा संकल्प सोडला. यावेळी या जोडप्याचा हा संकल्प स्वागत समारंभाला आलेल्या पाहुंण्यांनाही आवडला. त्यांच्यापासून प्रेरित होत त्याच वेळी एकूण 21 जणांनी पुर्नजिवन फाऊंडेशनच्या माध्यमातून अवयवदानाचा संकल्प करत या विवाहाच्या माध्यमातून समाजापुढे नवीन पायंडा ठेवत आपणही समाजाचे काही देणे लागतो हा संदेश दिला.

परतवाडा शहरात पुर्नजिवन फाऊंडेशन गेल्या 4 ते 5 वर्षांपासून अवयवदान चळवळीवर कार्य करीत असून आतापर्यंत 400 ते 500 नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प केला. या शहरातील 4 ते 5 वेळा ग्रीन कॉरिओडरच्या माध्यमातून फुप्फुस, किडणी प्रत्यारोपीत करत रुग्णांना जीवनदान देण्यात आले. नवीन विवाहीत जोडपे पवन व शिवाणी यांचे सर्वप्रथम पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. या वेळी त्यांनी अवयवदानाचा अर्ज भरल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.

या वेळी पुर्नजिवन फाऊंडेशचे अध्यक्ष डॉ. राजेश उभाड, डॉ. हर्षराज डफडे, जितेंद्र रोडे, विश्राम कुलकर्णी, रक्तवाहिनी एम एच 27 चे पदाधिकारी प्रितम लांडे उपस्थित होते. या प्रसंगी डॉ. राजेश उभाड यांनी अवयवदान चळवळ ही अत्यंत आवश्यक असल्याची सांगत उपस्थितांना सहभागी होण्याचे आवाहन केले, तर जितेंद्र रोडे यांनी आपल्या मनोगतातून अवयवदान चळवळ अशा सार्वजनिक कार्यक्रमातून गतीमान करण्याची गरज असल्याचे म्हटले.

पवन व शिवाणी बोंडे या नवदाम्पत्यासह लग्नात आलेले पाहूणे मनोज वानखडे, प्राजंली वानखडे, निलेश हरणे, पुजा हरणे, रोशन कडू, शीतल कडू, अंकुश खोंडे, मिनल खोंडे, अमोल बोंडे, अंजली बोंडे, राहुल गोटे, सचिन पेटकर, आदित्य चौधरी, सचिन पुलगमकर, नरेंद्र शेकोकर, प्रतिक वानखडे, मयुर बोंडे, सोमेश बोंडे, अंकीत देशमुख यांनीही अवयवदानाचा संकल्प केला.

बातम्या आणखी आहेत...