आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान:सायबर गुन्हेगार आर्थिक फसवणुकीबरोबरच तुम्हाला कायद्याच्या कचाट्यात अडकवताहेत!; ईकेवायसीचे निमित्त करुन, रक्कम परतीचे आमीष देत विचारतात ‘ओटीपी’

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सायबर गुन्हेगार आतापर्यंत सर्वसामान्य जनतेची विविध कारणं सांगून आर्थिक फसवणूक करत होतेच, अजूनही ती सुरूच आहे. आता सायबर गुन्हेगार त्या प्रकाराच्या ही एक पाऊल पुढे गेले असून, तुम्हाला कॉल करुन विविध कारणं सांगून ‘ओटीपी’ विचारतात. हा ‘ओटीपी’ वापरुन ऑनलाइन बँक खाते उघडून दुसऱ्यांसोबत केलेल्या फसवेगिरीची रक्कम तुमच्या खात्यात जमा करतात, या प्रकारामुळे तुमचा काहीही संबंध नसताना पोलिसांच्या तपासात तुम्हाला कायद्याच्या चौकटीत अडकवण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. त्यामुळे कोणत्याही कारणांसाठी कोणालाही आपले कागदपत्र किंवा ओटीपी देणे धोकादायक ठरु शकते. शहरात नुकतेच असे दोन प्रकार पुढे आले असून, ते व्यक्ती मदतीसाठी सायबर पोलिसांपर्यंत पोहोचले आहेत.

एखाद्यावेळी अनोळखी क्रमांकावरून कॉल येतो व ई केवायसी करण्याबाबत सूचना दिली जाते. तुमचे एटीएम कार्ड बंद होणार आहे. ऑनलाइन अडकलेली रक्कम परत मिळवण्यासाठी काय करावे, असे वेगवेगळी आमीष देवून तुम्हाला अनोळखी क्रमांकावरून कॉल येतात. समोरुन बोलणारा सायबर गुन्हेगार बोलताना तुम्हाला संशय येईल, असे काहीही न बोलता तंतोतंत तुम्हाला असलेली अडचण सोडवण्यासाठीच जणू तो कार्यरत आहे, असे बोलून विश्वास संपादन करतो. त्यावेळी आपणही भावनेच्या भरात व आपले काम होणार, या अपेक्षेने त्याच्यासोबत बोलतो. त्यानंतर तो अनोळखी व्यक्ती तुम्हाला म्हणतो की, आपली ओळख पटावी, यासाठी आम्हाला पॅनकार्ड, आधार कार्ड क्रमांक सांगा किंवा त्या कार्डचा फोटो काढून आम्हाला पाठवा. यावेळी त्या अनोळखी व्यक्तीकडे ते क्रमांक दिल्या जातात.

त्यानंतर हे सायबर गुन्हेगार त्यांचे मुळ काम सुरू करतात. आधार व पॅन कार्ड क्रमांकाच्या आधारे ते आपल्या नावाचा वापर करुन ऑनलाइन बँक खाते काढण्याची प्रक्रिया सुरू करतात. हे करत असतानाच आधार कार्डाला लिंक असलेल्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी येतो, तो क्रमांक आपला असतो व मोबाइल आपल्याकडे असतो. तुमचेच काम सुरू आहे, असे सांगून हा सायबर गुन्हेगार आपल्याला आलेला ओटीपी विचारतो, आपणही तो ओटीपी सहज म्हणून देतो, त्या आधारे ऑनलाइन बँक खाते उघडले जाते आणि सायबर गुन्हेगाराचे ‘टार्गेट’ पूर्ण होते. त्यावेळी आपली कोणतीही आर्थिक फसवणूक होत नाही. इतकेच नाहीतर आपल्या नावाने खाते उघडल्या गेले, हे सुद्धा माहीत होत नाही. कारण ऑनलाइन खाते उघडताच सायबर गुन्हेगार संबंधित बँक खात्यासोबत स्वत:चा मोबाइल क्रमांक त्या खात्यासोबत लिंक करतो, त्यामुळे बँकेच्या व्यवहाराची माहितीसुद्धा आपल्याला होऊ शकत नाही.

नव्याने बँकेत काढलेले बँक खाते आपल्या नावाने असले तरीही त्यामध्ये व्यवहार मात्र तो सायबर गुन्हेगार करतो. या खात्याचा वापर करुन सायबर गुन्हेगार कोणालाही आर्थिक गंडा घालतो. त्यावेळी संबंधित व्यक्तीला हाच खाते क्रमांक देवून रक्कम त्यामध्ये वळती करतो. त्यामधून नंतर तो रक्कम काढून घेतो. मात्र, त्या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांना आपल्या नावे काढलेले बँक खाते समोर येते. खाते आपल्या नावे राहते. बँक खात्याला पत्त्यासह इतर सविस्तर माहिती आपलीच राहते. त्यामुळे पोलिसांच्या दृष्टीने बँक खाते ज्याच्या नावेे तो आरोपीच्या पिंजऱ्यात येतोच. असे अलीकडे घडत असल्याचे समोर आले आहे

बातम्या आणखी आहेत...