आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहीहंडी पाहण्यासाठी गेलेल्या प्रेक्षकाच्या अंगावर बस शेड कोसळले:5 जण जखमी, अमरावतीतील घटना

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती शहरातील नवाथे परिसरात गोकुळाष्टमीनिमित्त युवा स्वाभिमानी पक्षाच्यावतीने रविवारी (दि.21) दहीहंडी स्पर्धा आयोजित केली आहे. या वेळी दहीहंडी पाहण्यासाठी हजारोंचा जमाव जमला होता. त्याचवेळी नवाथे परिसरात असलेले शहर बसच्या बसशेडवर काही उत्साही तरुण चढले होते. यावेळी अतिवजनामुळे ते शेड कोसळले. यावेळी शेडखाली उभे असलेले पाच जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. ही घटना रविवारी सांयकाळी साडेचार ते पाच वाजताच्या सुमारास घडली आहे.

नवाथे चौकातील दहीहंडीसाठी विदर्भातून गोविंदा पथक सहभागी झाले आहेत. तसेच सिने कलावंत गोविंदा, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवरसुध्दा त्या ठिकाणी पोहचले होते. त्यामुळे नागरीकांनी प्रचंड गर्दी केली होती. दरम्यान आयोजन स्थळापासून काही मीटर अंतरावर बसचे एक शेड आहे. यावेळी काही उत्साही युवक दहीहंडीचा आनंद घेण्यासाठी शेडवर चढले होते. याचवेळी शेडखाली काही जण बसून तर काही उभे होते.

जखमींवर उपचार

लोखंडी शेडवर अतिवजन सहन न होवू शकल्यामुळे शेडचा वरील भाग कोसळला. त्यामुळे काही वेळासाठी चांगलीच धावपळ झाली होती. जखमींना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी किरकोळ जखमींवर प्रथमोपचार करुन सुटी देण्यात आली. या घटनेने शहरात खळबळ उडाली होती.

बातम्या आणखी आहेत...