आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांदीचे दागिने चोरट्यांनी लांबवले:श्रीकृष्ण विहारात मध्यरात्री दीड लाखांची धाडसी चोरी

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीकृष्ण विहारमध्ये भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका अडत्याच्या घरात शुक्रवार ते शनिवारी (दि. १०) मध्यरात्रीदरम्यान चोरी झाली आहे. यावेळी चोरट्यांनी अडत्याच्या घरातून ३० हजार रोख व सोन्या, चांदीचे दागिने लंपास केले आहे. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मधुसुदन ओमप्रकाश राठी (३६, रा. श्रीकृष्णविहार, अमरावती) यांच्या घरी चोरी झाली आहे. राठी हे अडते आहेत. राठी यांनी दोन दिवसांपूर्वीच श्रीकृष्णविहार भागात देशमुख यांच्या घरी भाडेतत्वावर राहण्यासाठी घर घेतले आहे. त्यामुळे जुन्या घरातून संसारपयोगी साहीत्य आणून घरी ठेवले. दरम्यान शुक्रवारी रात्री त्यांना काही कामानिमीत्त भातकुली येथे जावे लागले. त्यामुळे ते परिवारासह शुक्रवारी रात्री अकरा वाजता अमरावतीतून भातकुलीला गेले. दरम्यान, शनिवारी सकाळी ११ वाजता घरी आले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. यावेळी चोरट्यांनी ३० हजार रोख तसेच सोने व चांदीचे दागिने असा सुमारे दीड लाखांचा ऐवज राठी यांच्या घरातून चोरुन नेला.

बातम्या आणखी आहेत...