आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अचलपुरात गणेशोत्सवादरम्यान एकतेचे दर्शन ; वाद्य बंद करुन दिला रस्ता

परतवाडा24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुस्लिमबहुल वस्ती असलेल्या अचलपूर शहरातील झेंडा चौक नेहमीच जातीय तेढ निर्माण होऊन झालेल्या विवाहीत घटनांचा साक्षीदार ठरला आहे. या चौकात होणाऱ्या विवादांची नोंद पोलिस दप्तरी संवेदनशील असली, तरी मात्र गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान मुस्लिम महिलेची अंत्ययात्रा जात असताना गणेश भक्तांनी आपले वाद्य, ढोल-ताशे बंद ठेवत या अंत्ययात्रेसाठी दिलेला रस्ता या झेंडा चौकाची नवीन ओळख होऊन तो हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक ठरला आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक सौहदार्याच्या एक नवा पायंडा घालत पुनश्च जातीयवादी कुनीतीला थारा न देत सामाजिक एकतेचे दर्शन घडवले. अचलपूर शहरात गणपती विसर्जनाची मिरवणूक सुरू असताना विविध सार्वजनिक गणेश मंडळांचे सदस्य गणपती बाप्पाला निरोप देताना भक्तिभावात तल्लीन होते. मिरवणुकीदरम्यान बिलनपुरा, अचलपूर येथील झेंडा चौक हा नेहमीच गर्दीचा भाग असतो. त्याच दरम्यान अचलपूर शहरातील बियाबानी निवासी शेख रफिक किराणा यांच्या परिवारातील एका महिलेचे निधन झाल्याने त्यांची अंतिम यात्रा या झेंडा चौकातून जात असताना सर्व गणेशोत्सव मंडळाने आपले ढोल-ताशे, पारंपारिक वाद्य व लेझीम बंद ठेवली. खिडकी गेटपर्यंत ही अंत्ययात्रा गेल्यानंतर गणपती विसर्जनाची मिरवणूक पुन्हा प्रारंभ झाली. अचलपूर शहर संवेदनशील नव्हे, तर सर्वधर्म समभावाचा विचार देणारे शहर असल्याचा संदेश या मिरवणुकीच्या माध्यमातून दोन्ही समाजबांधवांनी दिला. या वेळी अचलपूरचे ठाणेदार माधव गरुड, शांतता समिती सदस्य, हेल्पलाईन सदस्य, गणपती मंडळ सदस्य व सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरला.

बातम्या आणखी आहेत...