आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे आश्वासन:दर्यापूर, अंजनगाव तालुक्यात भरपाईसह पीक विमा मिळणार

दर्यापूर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील दर्यापूर, अंजनगाव तालुक्यात ऑगस्ट महिन्यात सरासरी पेक्षा जास्त झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. दरम्यान शासनाने या तालुक्याची आणेवारी जास्त असल्याने दोन्ही तालुक्यांना ओला दुष्काळग्रस्त भागाच्या यादीतून वगळल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान शेतकऱ्यांच्या गंभीर समस्येची दखल घेत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल पाटील अरबट यांनी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यावेळी त्यांनी दर्यापूर, अंजनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसह पीक विमा मिळणार, अशी हमी त्यांनी दिली.

जुलै महिन्यात कमी पाऊस झाला होता व त्याच महिन्यात सर्वेक्षण करून आणेवारी जाहीर झाल्याने या दोन तालुक्यात पीक आणेवारी ५३ टक्के पर्यत लागली. त्यामुळे दर्यापूर व अंजनगाव तालुका दुष्काळग्रस्त मदत योजनेतून वगळण्यात आला होता. परंतु, ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती अरबट यांनी भेटीदरम्यान कृषी मंत्री सत्तार यांना दिली. तसेच दर्यापूर व अंजनगाव तालुक्याला ओला दुष्काळ भाग म्हणून जाहीर करून सरसकट पिक विमा द्या,अशी मागणी अरबट यांनी केली होती.

बातम्या आणखी आहेत...