आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • Daryapur Buying And Selling Union Election 73 Nominations Filed For The Election Of 17 Director Posts, Nomination Papers Will Be Scrutinized Tomorrow

दर्यापूर खरेदी विक्री संघाची निवडणूक:17 संचालक पदाच्या निवडणुकीसाठी 73 उमेदवारी अर्ज दाखल, उद्या नामनिर्देशन पत्राची छाननी

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्याच्या सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेली दर्यापूर तालुका शेतकी खरेदी विक्री संघाच्या १७ संचालक पदांची निवडणूक होत आहे. गुरूवारी (दि. ३) नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ७३ इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. शुक्रवारी (दि. ४) रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे. २१ नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल.

शेतकी खरेदी विक्री संघाची मुदत २०२० मध्ये संपुष्टात आली होती. दरम्यान कोरोना काळामुळे दोन वर्षे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता निवडणुकीचा बिगूल वाजता असून उमेदवारही त्यासाठी सरसावले आहेत. दरम्यान गुरूवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. शुक्रवारी नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार असून सोमवारी (दि. ७) अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे.

जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार २१ नोव्हेंबर रोजी उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर २२ नोव्हेंबर रोजी अंतिम उमेदवारांची पहायला मिळणार आहे. त्यानंतर प्रचाराची रणधुमाळी रंगणार आहे. या निवडणुकीसाठी ४ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे ५ डिसेंबर रोजी मतमोजणी हाेवून निवडणुकीचा निकाल घोषित केला जाणार आहे.

तालुक्यातील सहकार क्षेत्रातील विविध संस्थांंच्या निवडीणुकीचा शुभारंभ दर्यापूर तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री समितीचया निवडणुकीने झाला आहे. इतर स्थानिक संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होतील अशी शक्यता सहकार क्षेत्रातून वर्तवण्यात येत आहे.

राज्यातील सत्ता बदलानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेची पहिलीच निवडणूक होत आहे. खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी एकूण ९७ उमेदवारी अर्जांची उचल करण्यात आली होती. दरम्यान शेवटच्या दिवसा अखेरीस दुपारी तीन वाजेपर्यंत ७३ अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान निवडणुकीच्या प्रचारासाठी उमेदवार व सर्मथकांनी आतापासूनच नियोजनावर भर दिला आहे.

खरेदी विक्री संघाच्या निवडणूक प्रक्रीयेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भातकुलीचे सहकार विभागाचे अधिकारी गजानन वढेकर व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून दिपाली बुंदेले कामकाज पाहत आहेत.

बातम्या आणखी आहेत...