आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज उमेदवारी अर्जांची छाननी:दर्यापूर खविसं निवडणूक: संचालकांच्या 17 जागांसाठी 73 उमेदवारी अर्ज दाखल

दर्यापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्याच्या सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेली दर्यापूर तालुका शेतकी खरेदी विक्री संघाच्या १७ संचालक पदांची निवडणूक होऊ घातली आहे. गुरूवारी (दि. ३) नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ७३ इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. शुक्रवारी (दि. ४) रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे. २१ नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल.

शेतकी खरेदी विक्री संघाची मुदत २०२० मध्ये संपुष्टात आली होती. दरम्यान, कोरोना काळामुळे दोन वर्षे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. गुरूवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. शुक्रवारी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून सोमवारी (दि. ७) अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार २१ नोव्हेंबर रोजी उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.

त्यानंतर २२ नोव्हेंबर रोजी अंतिम उमेदवारांची पाहायला मिळणार आहे. त्यानंतर प्रचाराची रणधुमाळी रंगणार आहे. या निवडणुकीसाठी ४ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे ५ डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निवडणुकीचा निकाल घोषित केला जाणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भातकुलीचे सहकार विभागाचे अधिकारी गजानन वढेकर व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून दीपाली बुंदेले कामकाज पाहत आहेत.

बातम्या आणखी आहेत...