आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापावसाळा सुरू होताच बिळातून साप, नाग व अन्य सरपटणारे प्राणी निघायला सुरूवात झाली असताना सोमवारी तिवसा तालुक्यातील विविध गावातील नागरी वस्तीत आढळलेल्या तीन विषारी सापांसह अजगराला सर्पमित्राच्या रेस्क्यू टीमने जीवदान देत जंगलात सोडले. सेव्ह अॅनिमल सेव्ह नेचर ही चमू गेल्या अनेक दिवसापासून सापांचे जनतेपासून व जनतेचे सापांपासून संरक्षण करण्याचे काम करते.
आजवर अनेक विषारी, बिनविषारी सापांना पकडून जंगलात सुरक्षितपणे सोडण्याचे काम केले. सोमवारी तालुक्यातील तळेगाव ठाकूर, गुरूदेवनगर, कुऱ्हा, वरखेड या गावात नागरी वस्तीत आढळून आलेल्या ब्लॅक कोब्रा, ब्राऊन कोब्रा व घोणस जातीच्या तीन विषारी सापांना व अजगराला पकडून जीवदान दिले. सर्पमित्र शुभम विघे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत सर्पमित्र पवन भिवगडे, विशाल कुथे, संकेत मते, प्रसाद राऊत, अनिल विघ्ने, सुशांत नेवारे, कान्हा मुंदडा, प्रजवल शेंडे यांनी वरखेड, कुऱ्हा,त ळेगाव ठाकूर, गुरुदेवनगर येथून हे विषारी साप पकडले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.