आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामूहिक हनुमान चालिसा:वायएसपीच्या तान्हा पोळ्यात सजवलेले बैल मुख्य आकर्षण

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खा. नवनीत राणा व आ. रवी राणा यांच्या मार्गदर्शनात युवा स्वाभिमान पार्टी व एकता गणेश मंडळाच्या वतीने रवीनगर-छांगाणी नगर येथे आयोजित सामूहिक तान्हा पोळा, बैल सजावट व वेशभूषा स्पर्धेस बालगोपाल व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लहान बालकांनी सजवलेले मातीचे बैल मुख्य आकर्षण ठरले.

वायएसपीचे मार्गदर्शक सुनील राणा यांच्या हस्ते रामभक्त हनुमानजीच्या प्रतिमेचे पूजन व सामूहिक हनुमान चालिसा पठण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या वेळी मंचावर युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, शहर संघटक नितीन बोरेकर, जिल्हा संघटक अभिजित देशमुख, प्रवक्ता मिलिंद कहाळे, परीक्षक महेंद्र बक्षी, पूजा बोरेकर, माधवी अविनाश काळे, भूषण पाटणे, सुधीर लवणकर उपस्थित होते.

लहान मुलांनी सजवलेले मातीचे बैल सर्वांचे लक्ष वेधून घेत होते व विविध वेशभूषा केलेले बालक अतिशय निरागस व सुंदर दिसत होते. आपली संस्कृती व परंपरा जोपासून या यांत्रिक युगात लहान मुलांना शेती आणि बैलाचे महत्व समजावून सांगणाऱ्या या अभिनव कार्यक्रमाचे सर्वांनी कौतुक केले. उत्कृष्ट नियोजन व सुंदर आयोजन केल्याबद्दल आयोजक पराग व केतकी चिमोटे आणि सहकाऱ्यांना याबद्दल अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...