आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन:राष्ट्रपतींचा अवमान केला; काँग्रेसने माफी मागावी

अमरावती6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसचे लोकसभेतील खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राजकारण तापले आहे. मुर्मू यांच्याबाबत बोलताना राष्ट्रपत्नी असा शब्द प्रयोग चौधरी यांनी केला. चौधरी यांच्या या विधानानंतर सर्वत्र टीका होत आहे. काँग्रेसने देशाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे. काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मुंचा राष्ट्रपत्नी असा उल्लेख केल्याने लोकसभेमध्ये गोंधळ उडाला होता. भाजपने काँग्रेसवर टीका करत चौधरी यांनी माफी मागण्याची मागणीही केली. तर युवा स्वाभिमान पक्षाकडून चौधरी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला.

तसेच काँग्रेस पक्षाने देशाची जाहीर माफी मागावी, या आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.यावेळी माजी जिप सदस्य दिनेश टेकाम, सुमित कुमरे, गंगाराम जांभेकर, संभाजी कुमरे, शशिकांत आत्राम, राजेश उईके, नंदू दहिकर, नरेश गेडाम, अर्जुन युवनाते आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...