आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रेड पे निश्चितीसाठी महसूल विभागाचे अधिकाऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग -२ यांचे ग्रेड पेच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी काही प्रमाणात महसुली कामांवर परिणाम झाल्याने दिसून आले. जिल्ह्यातील ९४ अधिकारी या संपात सहभागी आहेत. तत्पूर्वी नागरिकांना संपादरम्यान कोणतीही समस्या निर्माण होऊ नये, म्हणून मंडळ अधिकाऱ्यांकडे कामाची जबाबदारी सोपवली आहे. सन १९९८ पासूनचा नायब तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ् यांवरील अन्याय दूर करावा, त्यांना राजपत्रित अधिकाऱ्यांची वेतनश्रेणी लागू करावी, या मुख्य मागणीसाठी हे बेमुदत आंदोलन करण्यात येत आहे.
या कामबंद आंदोलनात जिल्ह्यातील ९४ महसूल अधिकारी सहभागी झालेत. यामध्ये १२ उपजिल्हाधिकारी , १८ तहसीलदार आणि ५१ नायब तहसीलदार यांचा समावेश आहे. या वेळी तहसीलदार नीता लबडे, अरविंद माळवे, अशोक काळीवकर, सुनील रासेकर, प्रवीण देशमुख, निकिता जावरकर, वैशाली पात्रे, राम लंके, आशिष बिजवल, विवेक घोडके, सुभाष दळवी, डी. के. वानखडे आदी सहभागी झाले आहेत. जिल्हाकचेरीवर समोर आंदोलन करताना तहसीलदार, नायब तहसीलदार.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.