आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • Demand For Paving Of Roads In Ganeshnagar Before Asphalting; Statement Submitted By The Citizen To The Administrator Of The Municipal Council |marathi News

मागणी:गणेशनगरातील रस्त्याचे डांबरीकरण करण्याआधी खडीकरणाची मागणी; नगर परिषदेच्या प्रशासकांकडे नागरिकांनी सादर केले निवेदन

अंजनगाव सुर्जीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

न.प. कार्यालय अंतर्गत गणेश नगर प्रभाग क्र. २ मध्ये अग्रवाल ते भंडागे यांच्या घरासमोरील डांबरी रस्त्याचे बांधकाम मंजूर करण्यात आले. परंतु, या बांधकामाच्या अंदाजपत्रकात खडीकरण नसून डांबरीकरणच दिले आहे. त्यामुळे या रस्त्यावर डांबरीकरण करण्यापूर्वी खडीकरण करा, असे निवेदन न. प. चे मुख्याधिकारी तथा प्रशासक सुमेध अलोणे यांना देणात आले.

गणेशनगरातील रस्त्याचे खडीकरण १३ ते १४ वर्ष जुने आहे. असे असतानाही नगर परिषदेच्या अंदाजपत्रकात रस्त्याच्या खडीकरणासाठी तरतूदच करण्यात आली नाही. गणेशनगर हा भाग ३५ ते ४० वर्षे जुना असूनही या रस्त्याचे निर्माण झाले नाही. सध्या खडीकरण न करता थेट डांबरीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्याचे खडीकरण करावे अन्यथा बांधकाम होऊ देणार नाही, असा इशारा प्रशांत कोल्हे, सागर येवले यांनी दिला आहे.

वेळेवर कोणताही बदल शक्य नाही
सहा महिन्यापूर्वी तत्कालिन नगरसेवकांच्या सभेने या कामाचा निर्णय घेतला आहे. सभेने ज्या कामाचा निर्णय घेतला तेच काम होणार. ऐनवेळी वेळेवर कोणताही बदल होऊ सुमेध अलोने, प्रशासक, नगर परिषद अंजनगाव सुर्जी.

बातम्या आणखी आहेत...