आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाणेदारांची भेट:पशुधन चोरीच्या घटनांना आळा घालण्याची मागणी ; पोलिसांना निवेदन सोपवून साकडे

धामणगाव रेल्वेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पशुधन चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे त्या घटनांना आळा घालण्यासोबतच पशुधन चोरणाऱ्यांना अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, यासाठी राष्ट्रीय गोरक्षा मंचच्या वतीने जिल्हाध्यक्ष हितेश गोरिया यांच्या नेतृत्वात दत्तापूर पोलिसांना साकडे घालण्यात आले.

गोरिया यांच्या नेतृत्वात एका प्रतिनिधी मंडळाने ठाणेदारांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. अमरावती जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये दररोज पशुधन चोरीची प्रकरणे वाढत असून पशुधन चोरणाऱ्यांवर कारवाई होत नसल्यामुळे या घटनांमध्ये वाढ होत आहे. चोर सर्रासपणे पशुधनाची चोरी करित असून त्यांच्यावर कुणाचाही वचक उरलेला नाही. शेतांमधून तसेच पशुपालक यांच्या घरासमोरून पशुचोरी होत आहे. या घटनांमध्ये पोलिसांनी त्वरित कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. निवेदन देतेवेळी मंचचे उपाध्यक्ष गोपाल शर्मा, अनिल शर्मा, कपिल शर्मा यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान स्थानिक पोलिस याबाबत फारसे गंभीर नसल्याचे लक्षात आल्याने हे प्रकरण आता जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या दालनात पोहोचले आहे. पोलीस अधीक्षकांनी याबाबत कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली असून ते कोणती पावले उचलतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, दुपारच्या वेळी महिला घरात एकट्या असताना काहीतरी वस्तू विक्री किंवा भांडी विक्रीच्या माध्यमातून घरात प्रवेश करुन घरातील महिलांचा विश्वास संपादन करुन त्यांना लुबाडण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत.

बातम्या आणखी आहेत...