आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इमारत पाडली:जवाहर गेट येथे 100 वर्षे जुनी इमारत पाडली ; धोका टाळण्यासाठी मंगळवारी  मनपाद्वारे कार्यवाही

अमरावतीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील प्रभाग क्रमांक १४ जवाहर गेट येथील मुख्य रस्त्यावरील मोहम्मद जफर अब्दुल गणी (भोगवटदार घनश्यामदास पारवाणी) यांची १०० वर्षे जुनी इमारत शिकस्त झाली होती. पावसाळ्यात धोका टाळण्यासाठी मंगळवारी मनपाद्वारे पाडण्यात आली.

इमारत पाडण्यासाठी मोहम्मद जफर तसेच भोगवटादार यांना वेळोवेळी नोटीस देण्यात आल्या होत्या. तरीही त्यांनी नोटिशीला कोणताही प्रतिसाद न दिल्याने तसेच इमारत पडून अपघात होण्याची शक्यता असल्याने पश्चिम झोन क्रमांक ५ भाजी बाजार तसेच अतिक्रमण विभागाने संयुक्त कारवाई करून इमारतीचे बांधकाम पाडण्यात आले. सहाय्यक आयुक्त तथा उपअभियंता तौसिफ काझी, अतिक्रमण पथक प्रमुख अजय बन्सेले, अभियंता सचिन मांडवे, अतिक्रमण विभागाचे योगेश कोल्हे, श्याम चावरे उपस्थित होते.