आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेश सध्या गंभीर आर्थिक संकटात असताना केंद्रातील भाजप सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाचे प्रकल्प अदानी समुहाला विकण्याचा सपाटा लावला आहे. मोदी सरकारच्या उद्योगपतीधार्जिण्या धोरणामुळे अदानींचा महाघोटाळा उघड झाला असून जनतेच्या पैसा सुरक्षित रहावा व या महाघोटाळ्याचा पर्दापाश व्हावा, याविरोधात अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरूवारी (दि. 9) येथील एसबीआय बँक शाखेसमोर आंदोलन करण्यात आले. डफळी वाजवत नकली व प्रतिकात्मक नोटा आंदोलन स्थळी फेकून केंद्र सरकारच्या चुकीच्या वित्तीय धोरणाचा निषेध करण्यात आला.
या वेळी तालुकाध्यक्ष सतिश पारधी, वैभव वानखडे यांनी हिडेनबर्गने केलेल्या संशोधन आणि 88 प्रश्नांचा उलगडा केला. आंदोलनात आजी माजी पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकारी, काँग्रेस कमिटी पदाधिकारी, दिलीप काळबांडे, सेतू देशमुख, मोहन वानखडे, कल्पना दिवे, शिल्पा हांडे, भारत ढोणे, निलेश खुळे, अब्दुल सत्तार, योगेश वानखडे, किसन मुंदाणे, संदीप आमले, वसंत जीरापुरे, रवींद्र हांडे, रितेश पांडव, राजू वेरूळकर, प्रकाश माहोरे, रुपाली काळे, मुकूंद पुनसे, अमर वानखडे, नरेश लांडगे, लुकेश केने, अतुल खुळे, छत्रपती डोंगरे, प्रदीप वानखडे, प्रदीप बोके, अंकुश देशमुख, वैभव ढवळे, हरिदास भगत, किशोर दिवे, धिरज ठाकरे, नरेंद्र विघ्ने, वैभव काकडे, आशिष ताथोडे, राजेश ठाकरे, सचिन वानखडे, शशांक राऊत, विलास हांडे, दीपक पावडे, मधुकर भगत, अतुल तिखे, मंगेश राऊत, संजय चौधरी, अजय बाखडे, जसबीर ठाकुर, राजेंद्र मालोदे, राजू शिर्के, सुधीर बोके, शरद देशमुख, प्रमोद पाटील, सुरज धुमनखेडे, विशाल केने, श्रीकांत भोंबे, अनिकेत प्रधान, नामदेव तांबे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.