आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादोन वर्षांपासून डीएपीचे उत्पादन न करणाऱ्या एका नामांकित कंपनीच्या नावाचा गैरवापर करुन माती, रेती मिक्स असलेले खत ‘डीएपी’ म्हणून विक्रीचा गोरख धंदा चांदूर बाजार तालुक्यात सुरू असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे व शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून कृषी विभागाच्या पथकाने चांदूर बाजार तालुक्यातून माती, रेती मिश्रित डीएपी शुक्रवारी (दि. १७) रात्री शेतकऱ्यांकडून ताब्यात घेतले आहे. तसेच शेतकऱ्यांना विक्री करणाऱ्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शुक्रवारी सायंकाळी कृषी विभागाच्या पथकाने माधान गाठले. शेतकरी दिनेश हिम्मत राव देशमुख यांनी कृषी विभागाकडे दिलेल्या तक्रारीवरून पथकाने त्यांच्याकडे असलेल्या डीएपीची पाहणी केली, त्यामध्ये रेती व माती मोठ्या प्रमाणात मिसळली असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले. त्यामुळे कृषी अधिकाऱ्यांनी हे रेती, माती मिश्रित डीएपीची शेतकऱ्यांना विक्री करणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध चांदूर बाजार पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी खते नियंत्रण आदेश १९८५, अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ व भारतीय दंड संहिता १८६० अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. ही कारवाई कृषी अधीक्षक अनिल खर्चान, कृषी विकास अधिकारी जी. टी. देशमुख, जिल्हा कृषी अधिकारी अजय तळेगावकर, कृषी अधिकारी नारायण आमझरे, चांदूर बाजारच्या तालुका कृषी अधिकारी फाल्गुनी नानिर, एपीआय प्रमोद राऊत यांनी केली आहे. ११५० रुपयात घरपोच ‘डिलिव्हरी’ शेतकऱ्यांना डीएपी असल्याचे सांगून ११५० रुपये बॅगप्रमाणे घरपोच विक्री केली जात होता. जिल्ह्यात अशाप्रमाणे अजूनही काही भागात बोगस डीएपीची विक्री केली जात असल्याची माहिती आहे. त्याचाही शोध घेत आहे. माधानवरुन आम्ही २५ बॅग ताब्यात घेतल्या आहेत. प्रथमदर्शनी त्यामध्ये रेती व माती मोठ्या प्रमाणात दिसून आले. आम्ही नमूने घेतले असून, प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवणार आहे. जी. टी. देशमुख, कृषी विकास अधिकारी, जि.प. अमरावती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.