आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारामकथा हे आमचे राष्ट्रीय चारित्र्य व राष्ट्रीय संस्कार आहे.रामकथेत अवीट व अमिट गोडवा असून आम्हा सर्वांना सन्मार्ग दाखवणारी दाखविणारी ही कथा आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि. ५) बडनेरा येथे सांगितले. रविवारी उपमुख्यमंत्र्यांनी अमरावती दौऱ्यादरम्यान बडनेरा येथे जावून माँ कनकेश्वरी यांच्या वाणीतून सुरू असलेली रामकथा श्रवण केली.
बडनेरा येथील मैदानावर आयोजित माँ कनकेश्वरी देवी जनकल्याण ट्रस्टतर्फे आयोजित रामचरित मानस कथागंगा संमेलनाला देवेन्द्र फडणवीस यांनी भेट देऊन रामायण ग्रंथ व माताजींचे दर्शन घेतले. खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे पाटील, दिनेश सूर्यवंशी, शिवराय कुलकर्णी, किरण पातूरकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मां कनकेश्वरी व रामायणाचे दर्शन घेण्याचे भाग्य आज लाभले, अशी भावना उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.