आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्या एचव्हीपीएमच्या ध्यानचंद स्टेडियमचे उद्घाटन:उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार शुभारंभ

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळद्वारा संचालीत डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनच्या बहुविध सुविधांनी सुसज्जित मेजर ध्यानचंद स्टेडियमचा उद्घाटन सोहळा रविवार 21 रोजी रोजी दु. 1 वाजता मंडळातील अनंत क्रीडा मंदीर येथे आयोजित करण्यात आला आहे. या इनडोअर स्टेडियममध्ये मॅट कबड्डी, तायक्वांदो, कुस्ती हे खेळ खेळण्यासोबतच हेल्थ सेंटरचीही सोय आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मेजर ध्यानचंद स्टेडियमचे उद्घाटन होणार आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहतील. प्रमुख अतिथींमध्ये खा. रामदास तडस, राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे, खा. नवनीत राणा, आ. रवी राणा यांचेसह समारंभाध्यक्ष म्हणून मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. रमेश गोडबोले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या प्रसंगी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. अमरावतीचे बलस्थान असलेले श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे आयोजित मेजर ध्यानचंद स्टेडीयम उद्घाटन सोहळ्याला शहरवासीय व खेळाडूंनी मोठ्या संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन हव्याप्र मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य, मंडळाच्या सचिव डॉ. माधुरीताई चेंडके, उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत चेंडके, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनचे प्राचार्य डॉ. अजयपाल उपाध्याय तसेच मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

मेजर ध्यानचंद स्टेडियमची वैशिष्ट्ये

11,500 चौरस फुटाचे बांधकाम

3 कोटी रूपये खर्च

मॅट कबड्डी, बॉक्सिंग, तायक्वांदो, कुस्ती, हेल्थ सेंटर अशा बहूविध सुविधा

100 क्रीडापटूंची निवास व्यवस्था उपलब्ध

आधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज

बातम्या आणखी आहेत...