आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जबाबदारी:पोलिस उपायुक्त सागर पाटील रुजू, परिमंडळ -1 ची मिळाली जबाबदारी

अमरावती13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहा दिवसांपूर्वी राज्यभरातील सुमारे १०० वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्या बदलीमध्ये पुणे आयुक्तालयात असलेले डीसीपी सागर पाटील यांची अमरावती पोलिस आयुक्तालयात बदली झाली होती. दरम्यान सोमवारी डीसीपी सागर पाटील अमरावती आयुक्तालयात रुजू झाले असून, त्यांच्याकडे परिमंडळ - १ ची जबाबदारी देण्यात आली.

सागर पाटील रुजू झाल्यानंतर नवीन जबाबदारीचे सूत्रे हातात घेतली आहेत. याचवेळी मागील दीड वर्षांपासून अमरावतीला पोलिस उपायुक्त असलेले एम. एम. मकानदार कार्यमुक्त झाले आहेत. मकानदार यांची खंडाळा पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य म्हणून बदली झाली आहे. दरम्यान सोमवारी पोलिस आयुक्तालयाच्या वतीने पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या उपस्थितीत डीसीपी मकानदार यांना निरोप देण्यात आला. तसेच डीसीपी पाटील हे रुजू झाल्यामुळे त्यांचे स्वागत करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...