आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्कामोर्तब:उपअभियंता झगडे यांचा जि. प. अभियंता संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणीत समावेश

अमरावती25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती जिल्हा परिषदचे प्रभारी उपअभियंता नितीन झगडे यांची केंद्रीय कार्यकारिणीच्या सदस्यपदी अविरोध निवड करण्यात आली आहे. जिल्हा परिषद अभियंता संघटनेची राज्यस्तरीय बैठक नुकतीच जालना येथे पार पडली. या बैठकीत सर्वांनुमते त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या राज्यस्तरीय बैठकीला ३३ जिल्ह्यातील प्रतिनिध उपस्थित होते. अभियंत्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ही संघटना तयार करण्यात आली आहे. याप्रसंगी परभणीचे सुहास धारासुरकर यांची राज्याध्यक्ष, भंडारा येथील सतीश मारबदे यांची कार्याध्यक्षपदी तर यवतमाळचे गणेश शिंगणे यांची महासचिवपदी निवड करण्यात आली.

जिल्हा परिषद अभियंत्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी ही संघटना काम करते. त्याला योग्य हातभार लावण्यासाठी आपण नेहमी सक्रीय राहू, असे केंद्रीय कार्यकारिणीत निवड झालेल्या नितीन झगडे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. दरम्यान या निवडीबाबत कार्यकारी अभियंता (बांधकाम) विजय वाठ, कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा) राजेंद्र सावळकर, जलसंधारण कार्यकारी अभियंता जाधव, अभियंता राजेश लाहोरे, संजय घाणेकर, संजय तायवाडे, हरीभाऊ लुंगे, विजय राठोड, पी.टी. वानखडे, अतुल बिगारे, दिलीप कदम, स्नेहा धावडे, रोहीत सव्वालाखे, रमजान शाह, अनिल मुधोळकर आदिंनी त्यांचे अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...