आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाढदिवस की शक्ती प्रदर्शन:बुलढाण्यात उपनगराध्यक्षांच्या वाढदिवशी समर्थकांचा हातात तलवारी घेऊन डान्स, कार्यकर्त्यांना अटक

बुलढाणा14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मलकापूर परिसर धार्मिक आधारे संवेदनशील मानला जातो.

बुधवारी 10 फेब्रुवारी रोजी बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर नगर परिषदेचे काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष तथा उपाध्यक्ष हाजी रशीद खा जमादार यांच्या समर्थकांनी त्यांच्या वाढदिवसाचा केक कापण्यापूर्वी जल्लोषात व केक कापण्याच्या वेळी लखलखती तलवार हवेत फिरवल्या. याचा व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्याने मोहम्मद शोहेब मोहम्मद जाहीर, नवेद खान इस्माईल खान या 2 आरोपिंना ताब्यात घेऊन 5 तलवारी जप्त केल्या आहेत.

बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर नगर परिषदेचे काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष तथा उपाध्यक्ष हाजी रशीद खा जमादार यांच्या वाढदिवशी बुधवारी मलकापूर शहरातील नगर परिषदेच्या शाळेच्या आवारात रात्री उशिरापर्यंत पार पडलेल्या कार्यक्रमात डीजेच्या तालावर कार्यकर्त्यांनी असंख्य तलवारी हवेत फिरविल्या. एवढेच नव्हे तर विविध प्रकारचे नारे ही यावेळी दिल्याने शहरात खळबळ उडाली.

सदर घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने मलकापूर शहर पोलिसांनी दखल घेत रात्री उशिरा 2 युवकांना अटक करून त्यांच्याकडून 5 तलवारी जप्त केल्या असून त्यांचे विरुद्ध आर्म अॅक्ट नुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

काय म्हणाले रशिद जमादार

ज्या युवकांच्या हातात तलवारी होत्या त्यांना कार्यक्रम स्थळावरुन जाण्यास सांगितले. मला पोलिस प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे.ज्यांनी हे कृत्य केले आहे.त्यांच्यावर कारवाई करावी असे रशीद खा जमादार म्हणाले, हा विरोधकांचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.