आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा परिषदेच्या पाणी गुणवत्ता कक्षामार्फत जिल्हाभरातील ६ हजार ९९१ जलस्रोतामधील पाण्याची तपासणी २८ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीत महिला, जलसुरक्षक, आरोग्यसेवक आदींच्या निगराणीत ८४० ग्रामपंचायत क्षेत्रांतील पाणी स्रोतांचे नमुने तपासले जाणार आहेत. याबाबतची मोहीम जिल्हाभरात मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे.
जल जीवन मिशन अभियानांतर्गत पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून पाणी स्रोतांचे नमुने गोळा करून तपासणी करण्याच्या सूचना केंद्र शासनाकडून जिल्हा परिषदेला दिल्या होत्या. त्या अनुषंगाने ८४० ग्रामपंचायतींमधील ६ हजार ९९१ पाणी स्रोतांच्या नमुन्यांची फिल्ड टेस्ट किट द्वारे होणारी जैविक तपासणी जिल्हा परिषदेमार्फत गावागावांत राबवली जात आहे. यामध्ये या जल स्रोतांव्यतिरिक्त शाळा, अंगणवाडी, शासकीय कार्यालयातील पाणी स्रोतांचीही फिल्ड टेस्ट किट द्वारे तपासणी केली जाणार आहे.
शुद्ध पाणी हे आरोग्याची हमी देत असते. त्यामुळे ‘गावचे पाणी शुद्ध की अशुद्ध’ याची तपासणी ग्रामपंचायत क्षेत्रात महिला, जलसुरक्षक, आरोग्य सेवक स्वतः करणार आहेत. पाणी व स्वच्छता विभागासह भूजल सर्वेक्षण विभागामार्फत जिल्ह्यातील पाणी नमुन्यांची तपासणी वर्षातून दोनवेळा त्याव्यतिरिक्त ग्रामपंचायत स्तरावर पाण्याची जैविक तपासणी फिल टेस्ट किट द्वारे केली जात आहे.
या पाणी स्रोताचा नमुना आदी तपासणीसाठी प्रयोगशाळेत देण्यात येणार आहे. हा उपक्रम सीईओ अविश्यांत पंडा, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे डेप्युटी सीईओ श्रीराम कुलकर्णी आदींच्या मार्गदर्शनाखाली माहिती व पाणी गुणवत्ता सल्लागार नीलिमा इंगळेंसह कर्मचाऱ्यांमार्फत यावर नियंत्रण ठेवले जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.