आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांचा सत्कार:उपेक्षित महिलांच्या विकासाची दिशा ठरवणे ही खरी महिला दिनाची प्रेरणा

दर्यापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तुळशीदास धांडे यांचे प्रतिपादन प्रतिभा साहित्य संघातर्फे कष्टकरी महिलांचा सत्कार

खडतर परिश्रम आणि अढळ आत्मविश्वासाच्या बळावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून विविध क्षेत्रात छाप टाकणाऱ्या महिलांचे स्मरण करून आज उपेक्षित महिलांच्या विकासाच्या दृष्टीने प्रयत्नांची दिशा वळवणे ही खरी जागतिक महिला दिनाची प्रेरणा ठरेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रतिभा साहित्य संघाचे दर्यापूर येथील नवनियुक्त शहराध्यक्ष शिक्षक तुळशीदास धांडे यांनी केले. शहरातील संत गाडगेबाबा बालगृहात महाराष्ट्र प्रतिभा साहित्य संघाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कष्टकरी महिलांच्या आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी धांडे बोलत होते.

गाडगे बाबांचा वसा घेतलेल्या पती छत्र हरपलेल्या वयोवृद्ध कष्टकरी महिला सखुबाई देशमुख व अन्य महिलांचा शाल, श्रीफळ व गौरव चिन्ह देवून सत्कार करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय सेवानिवृत्त शिक्षक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष उत्तम कराळे, प्रमुख अतिथी म्हणून तालुका उपाध्यक्ष विनायक तायडे, भैया पाटील भारसाकळे, प्रतिभा साहित्य संघाचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल कुलट, विनोद शिंगणे, गजानन देशमुख, अॅड. अभिजीत देवके, गजानन सोनवणे, प्रवीण कावरे, राजेश ढोले, क्रीडा शिक्षक संतोष मिसाळ, दत्ता कुंभारकर, देवेंद्र ठाकूर आदींची प्रमुखउपस्थिती होती.

या प्रसंगी मथुरा भारसाकळे यांच्या सौजन्याने स्मृती चिन्ह देवून कष्टकरी महिलांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला बालगृहातील निराधार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गाडगेबाबा मिशनचे संचालक तथा गजानन देशमुख यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...