आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिपूजन:धामक येथे विकासकामांचे आमदार प्रताप अडसड यांच्या हस्ते भूमिपूजन

नांदगाव खंडेश्वर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील धामक येथे आमदार प्रताप अडसड यांच्या हस्ते तीन कोटींच्या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला. धामक येथे जिल्हा परिषद मराठीत शाळा ते कोरेगाव रस्ता व आमदार निधीतील क्षमा परवीन ते दिलीप बाजड यांच्या घरापर्यंत रस्त्याचे भूमिपूजन आमदार प्रताप अडसड यांच्या हस्ते पार पडले. गावातील विकासकामांना चालना मिळावी याकरिता प्रयत्नशील राहणार असल्याचे या वेळी आ. अडसड यांनी सांगीतले.

भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी भाजप जिल्हा सरचिटणीस राजेश पाठक, माजी नगराध्यक्ष संजय पोफळे, भारतीय जनता युवा मोर्चा तालुकाध्यक्ष निकेत ठाकरे, शहराध्यक्ष नवल खिची, भाजपचे दिनेश सोनकुसरे,अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष अजगर पठाण, ग्रामपंचायत सदस्य कौशल्य गोंडाने, माजी उपसरपंच श्याम राऊत, माजी सरपंच अजय निर्मळ, अतुल जयसिंगपूरे, प्रकाश दूधमोचन, निखिल मोरे, असलम पठाण, रमेश दूधमोचन, सदाशिव तामखाने, अरुण जनबंधू, कैलास राऊत, वसंत बावणे, गुलाम रसूल, रहेमान पठाण, प्रवीण नगराळे, अक्षय मस्के, रमेश शर्मा, संजय गवळी, स्वप्निल शेंडे, राहुल इंगोले, निखिल दूधमोजन, आकाश पंचपात्रे, जगदीश तामखाने, अमन दूधमोचन, अंकुश दूधमोचन, अक्षय रामावत, सुमित निर्मळ, महेश शेंडे, मंगेश मेश्राम, सचिन राऊत, निखिल पंचपात्रे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...