आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरोप:दीड दिवसाच्या बाप्पाला भक्तांनी दिला निरोप

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गणेश चतुर्थीच्या दिवशी अनेकांच्या घरात बाप्पा विराजमान झाले. दीड दिवसांच्या मुक्कामानंतर बाप्पांचे गुरुवारी विसर्जन विसर्जन करण्यात आले. काल आलेले गणपती बाप्पा आज जात आहे आहे म्हणून अनेक भाविकांच्या डोळ्यांत अश्रू होते. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशी घोषणा देताना लहान मुलांसह मोठेही गलबलून जातात. असे असले तरी पुढच्या वर्षी बाप्पा पुन्हा वाजत गाजत येणार आहे.

या घोषणा देऊन आपल्या बाप्पाला निरोप दिला.“गणपती बाप्पा मोरया, या पुढच्या वर्षी लवकर या “ जयघोषांसह अमरावती शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन झाले. बुधवारी जिल्हाभरात गणरायाचे घरोघरी आगमन झाले होते. मात्र, अनेकांच्या घरी परंपरेनुसार दीड दिवसांतच बाप्पाचे आगमन होते. त्यांनतर बाप्पाचे विसर्जन करण्यात येते. गणरायांची चतुर्थीच्या मुहूर्तावर स्थापना केली होती.

बातम्या आणखी आहेत...