आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअचलपूर तालुक्यातील नायगाव बोर्डी येथे सुरू असलेल्या श्रीमद महावाक्य निर्वचन निरुपण सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पंजाब, हरियाणा, दिल्ली येथील महानुभाव अनुयायी दाखल होत आहे. तीन हजार संत, महंत व भिक्षुकांसाठी करण्यात आलेल्या निवास व भोजनाच्या व्यवस्थेत दररोज भर पडत आहे. आयोजकांच्या वतीने नव्याने निवास व्यवस्था वाढवलेली आहे.
महाराष्ट्र अधिकरण आचार्य प्रवर श्री भास्कर बाबा महानुभाव हे अखंडित महावाक्य निरुपण करीत आहेत. १५ फेब्रुवारीपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याचा प्रारंभ १४ जानेवारीला करण्यात आला. दररोज सकाळ, दुपार व संध्याकाळ आयोजित या सोहळ्याला राज्यभराच्या कानाकोपऱ्यातून संत महंत व भीक्षुक सहभागी होत आहे. महावाक्य पोथीचे मोठ्या श्रध्देने श्रवन करण्यासाठी भाविकांची ही उपस्थिती लक्षणीय ठरत आहे. दररोज तीन हजार भाविकांच्या भोजनाची व निवासाची व्यवस्था करण्यासाठी परिसरातील महानुभाव अनुयायी आपली सेवा प्रदान करत आहे. या कार्यक्रमाचे आयोजन महंत अचलपूरकर बाबा, देपेराज बाबा पंजाबी, विजयराज पंजाबी, गोवर्धन अंकुळनेरकर यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.