आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील कोतवालांना शोषणमुक्त करून सन्मानाने जीवन जगण्याची संधीकरिता चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याच्या मुख्य मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कोतवाल संयुक्त संघर्ष समितीच्या नेतृत्वात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवार पासून बेमुदत उपोषणाचा इशारा समितीचे अध्यक्ष उत्तमराव गवई यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून दिला गेली ४० वर्षापासून समिती संघर्ष करीत आहे. आंदोलन केल्याशिवाय मानधनात वाढ होत नाही. १८ डिसेंबर २०२२ रोजी अधिवेशना दरम्यान मोर्चा काढण्यात आला.
त्यावेळी महसूल मंत्री यांनी आश्वासन दिले होते, मात्र त्यांनी दिलेले आश्वासन हे पाळले नाही. म्हणून मुख्य सचिव मनोकुमार श्रीवास्तव यांना १७ जानेवारीला निवेदन देऊन फेब्रुवारीपासून आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. . कोतवालांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळतो फक्त वेतन मिळत नाही. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा व सन १९९६ पासून वेतन हा शब्द बदलून मानधन टाकण्यात आला. त्यामुळे कोतवालांना ७ हजार रुपये मानधनावर परिवार चालवावा लागतो. २ फेब्रुवारी २०१९ ला भाजप सरकारने जीआर काढला. या जीआरमध्ये मानधन पाच हजाराहून साडेसात हजार रुपये करण्यात आले.
मात्र ज्या कोतवालांची सर्व्हिस दहा वर्षे झाली त्यांना २० रुपये मानधन वाढ, वीस वर्षे झाली त्यांना ८० रुपये, तीस वर्षे झाली त्यांना १३० रुपये मानधन वाढ देण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला. शासन प्रशासनातील नेते अधिकाऱ्यांच्या घरी असणाऱ्या पाळीव पशूंपेक्षाही अधिक खर्च केल्या जात असेल त्यापेक्षाही कमी मानधन वाढ कोतवालांना देण्यात आल्याने आंदोलनाचे हत्यार उपसावे लागल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. कोतवालांच्या प्रलंबित मागण्या तत्काळ पूर्ण करण्यात याव्या, या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सतीश जवंजाळ, संतोष सहारे, रणजित गजबे, राहुल राजस, शीतल पांडे, प्रियंका इंगोले, रुपाली म्हस्के, मुकेश धुर्वे, ओंकार देहाळे, शुभांगी तायडे, प्रफुल्ल भाकरे, सागर हिवसे, अनुप गणोरकर, सचिन वानखडे, रूपेश निकम, शीतल लवंगकर उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.