आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या अनुषंगाने पेरणीची तयारी प्रारंभ करत सोयाबीन, कपाशी, तूर आदी बियाण्यांच्या खरेदीला सुरूवात केली आहे. अमरावती जिल्ह्यासह अचलपूर तालुक्यात काही कृषी केंद्रावर एकाच सोयाबीनच्या वाणाचे दर वेगवेगळे निश्चित करत शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात आहे. शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या कृषी सेवा केंद्र व कंपनी बियाणे विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अचलपूरचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली आहे. कृषी केंद्र संचालक शेतकऱ्यांना बियाणे, कीटकनाशके विकताना योग्य ती माहिती देत नाहीत. सोयाबीन व कपाशीच्या बॅगवर अव्वाच्या सव्वा किमती असून, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. त्यामुळे ठरलेले दरपत्रक प्रथमदर्शनी लावून शेतकऱ्यांची लुबाडणूक थांबावी व तपासणी करिता पथक नेमण्यात यावे, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदन देतेवेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख नरेंद्र पडोळे यांच्या नेतृत्वात भैय्या भाकरे, अनिल सायंदे, अरुण करडे, विलास सोळंके, सागर वाटाणे, भास्कर सुरतकर, संदीप लव्हाळे, विजय ढोक, अंकुश तांबे, राहुल गावंडे, प्रणय हावरे, नंदकिशोर काळे, प्रमोद डिके, गोवर्धन मेहरे, ऋषिकेश सगणे, चेतन खंडारे, अक्षय पावडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.