आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्रभर गस्त:नागरी वस्तीत बिबटची चर्चा, वन विभागाच्या  महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांची रात्रभर गस्त

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील महिनाभरापासून शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला लागून असलेल्या नागरी वस्तीत तसेच विद्यापीठालगतच्या भागात सातत्याने बिबटचे वास्तव्य आहे. त्यामुळे या सर्व भागात वन विभागाने गस्त सुरू केली आहे. शनिवारी (दि. १) रात्रभर वन विभागाच्या महिला अधिकारी व महिला कर्मचाऱ्यांनी या भागात गस्त घातली आहे. यावेळी ‘एनजीओ’च्या पदाधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश होता.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मागील बाजूला १०५ एकर जंगल आहे. या भागात बिबट मागील काही दिवसांपासून वास्तव्य करत आहे. तो दररोज नाही मात्र चार ते पाच दिवसाच्या अंतराने वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये कैद होत आहे. तसेच मध्यंतरी या बिबटने परिसरात श्वान, डुकरांची शिकार केल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. विद्यापीठ परिसर, विद्यापीठाला लागून असलेल्या कॉलनी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, नवसारी, नवोदय विद्यालय परिसरात दररोज वन विभागाने गस्त सुरू केली आहे. शनिवारी रात्री वडाळीच्या आरएफओ वर्षा हरणे यांच्यासह वनपाल व चार महिला वनरक्षक या महिलांनी रात्रभर गस्त घातली. याचवेळी ‘एनजीओ’चे राघवेंद्र नांदे, यादव तरटे पाटील, सौरभ जंवजाळ आदी हजर होते. ज्या ज्या भागात बिबटचे वास्तव्य आढळले त्या भaागात वन विभागाने २० ट्रॅप कॅमेरा लावले. गस्तीदरम्यान नागरिकांसोबत संवाद साधला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...