आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:जि. प. मुख्याध्यापकाची धारणी येथे आत्महत्या ; पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल

धारणी4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील खाऱ्या येथील जि. प. शाळा मुख्याध्यापकाने मंगळवारी पहाटे धनईनगर येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. अनोखीलाल कोचलकर (४८) असे मुख्याध्यापकाचे नाव आहे. खाऱ्या येथे दोन वर्षांपासून सेवारत होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार असून, मुलगी डॉक्टर आहे. मंगळवारी पहाटे पत्नी झोपेतून उठून गॅलरीत आल्या असता अनोखीलालचा मृतदेह फासावर लटकलेल्या स्थितीत आढळून आला. त्यांची आरडाओरड ऐकून नागरिकांनी गर्दी केली. लगेच फौजदार सुरेंद्र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आत्महत्येचे नेमके कारण अजूनही समजू शकले नाही.

बातम्या आणखी आहेत...