आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंदनाची दोन:जि. प. सीईओंच्या बंगल्यातून चंदनाची दोन झाडं कापून नेली ; चंदन चोरट्यांचा शहरात धुमाकूळ सुरूच

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आठ दिवसांपूर्वी एकाच रात्री चोरट्यांनी शहरात तीन ठिकाणाहून चंदनाची पाच झाडं कापून चोरून नेली होती. त्या घटनेचा अजून छडा लागला नाही, तोच कांता नगर परिसरातील जिल्हा परिषद सीईओंच्या शासकीय बंगल्यातून चोरट्यांनी दोन चंदनाची झाडे चोरून नेली आहे. याप्रकरणी बुधवारी गाडगेनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुरेश पुंडलिकराव वानखडे (रा. अमरावती) यांनी या प्रकरणात पोलिसांत तक्रार दिली आहे. सुरेश वानखडे हे सीईओंच्या शासकीय बंगल्यावर सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहेत. कांता नगर परिसरात अनेक शासकीय अधिकारी तसेच उच्चपदस्थ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे शासकीय निवासस्थान आहे. याच परिसरात जिल्हा परिषदेचे सीईओ तसेच विद्यमान प्रभारी जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा यांचे सुद्धा निवासस्थान आहे. याच बंगल्याच्या परिसरात असलेली दोन चंदनाची झाडे चोरट्यांनी २९ मेच्या मध्यरात्री कापून चोरून नेली आहे. चोरीला गेलेली चंदनाची झाडे सहा इंच व्यासाची असून या झाडाची किंमत सुमारे दहा हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

बातम्या आणखी आहेत...