आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डस्टबिनचे वाटप:आदर्श ग्राम मधापुरी येथे सरपंचाद्वारे ६५० डस्टबिनचे वाटप; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

मूर्तिजापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील आदर्श तसेच राज्य पुरस्कार प्राप्त ग्राम मधापूरी येथे गावकऱ्यांना ६५० डस्टबिनचे वाटप सरपंच यांच्या हस्ते करण्यात आले. ग्राम मधापुरीद्वारा राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तर या गावाचा आदर्श इतर सर्व ग्रामपंचायतींनी घ्यावा असे म्हटल्या जात आहे. गावातील प्रत्येक घराला एक डस्टबिन देण्यात आला. ग्राम मधापुरीचे सरपंच प्रदीप ठाकरे यांनी स्वतः प्रत्येक कुटुंबाला ६५० डस्टबिनचे वाटप केले.

या उपक्रमासोबतच अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्यातून शासनाचे एसबीएम योजना तसेच स्वच्छ भारत मिशन योजने अंतर्गत ग्रामपंचायतच्या माध्यमातून ओला कचरा आणि सुखा कचरा विलगीकरण, प्लास्टिक व्यवस्थापन, दहा बाय दहाचे शोष खड्डे बनवून सांडपाण्याचे व्यवस्थापन आणि भूमिका डपाण्याच्या नाल्यांचे निर्माण देखील करण्यात आले आहे. प्लास्टिक मुक्त, कचरा मुक्त गावाच्या संकल्पनेमुळे गावात मानवाच्या आरोग्यास धोकादायक असलेल्या डास, मच्छरांची संख्या कमी झाल्याने गावात मलेरिया डेंगू व इतर आजारांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे उपक्रम गावात राबवल्या जात आहे.ग्राम मधापुरीच्या वाॅर्ड क्र.१ तसेच २ व ३ कुरूम रेल्वे स्टेशन रहिवासी यांचे आरोग्यासाठी प्लास्टिक व कचरा मुक्त गाव संकल्पनेतून सरपंच प्रदीप ठाकरे, ग्रा. पं. सदस्य व कर्मचारी यांनी घरोघरी जाऊन एक एक डस्टबिनचे वितरण केले. या उपक्रमात जिल्हा परिषद वरिष्ठ शाळेचे मुख्यध्यापक विजय रेवस्कर, देशभ्रतार, मुरड, मसनकर, टेंभरे, काले, पराते यांचाही सहभाग होता. गावात यापूर्वी देखील मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड, बांबू लागवड, आवळा, चिंच, आंबा, सिताफळ आदी फळ झाडे लागवड करण्यात आलेली असल्याचे सरपंच ठाकरे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...