आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला शिका, संघटित व्हा आणि समतेसाठी संघर्ष करा हा मूलमंत्र दिला आहे. त्यामुळे सध्याच्या राजकीय वातावरणात आपला संघर्ष सुरू ठेऊन प्रत्येक पाऊल जिंकण्याच्या दृष्टीने पुढे टाकले पाहिजे, असे आवाहन माजी पालकमंत्री अॅड. यशोमतीताई ठाकूर यांनी केले. अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा व तालुका पदाधिकारी यांना नियुक्ती पत्रांचे वितरण करण्यात आले. त्यानिमित्त शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा मेळाव्यात त्या बोलत होत्या.
प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष प्रवीण मनोहर, आमदार बळवंतराव वानखेडे, माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप, प्रदेश प्रवक्ते दिलीप एडतकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा जिल्हा बँकेचे संचालक हरीभाऊ मोहोड व प्रकाश काळबांडे, जि.प. चे माजी सभापती जयंतराव देशमुख, हरिष मोरे, अभय वंजारी, विरेंद्र जाधव, संजय नागोणे, दिलीप काळबांडे आदी उपस्थित होते.
जिल्हा महासचिव अभय वंजारी, उपाध्यक्ष मंगल कोंबे, कैलास कठाडे, दिनेश मकेश्वर, वंदना गवई, हरिभाऊ गंवई, बाबाराव दहिकर, सचिव राहुल उके, मनिषा इंगळे, संजय नागले, गोपाल पाटील, संघटक दिलीप वानखेडे, राजु कुर्हेकर, उर्मिला झारखंडे, संगिता सवाई, सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष सुमित कांबळे, सदस्य नीळकंठ चव्हाण, अनिल नगराळे, शरद लव्हाळे, प्रकाश वाघमारे आदींना यावेळी नियुक्तीपत्रे देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन अमरावती तालुकाध्यक्ष सुकुमार खंडारे यांनी केले. आभार अमोल गुडधे यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.