आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयोजन:जागतिक बौद्ध धम्म महोत्सवात बुद्ध मूर्तींचे वितरण ; चळवळीला गतिमान करण्याचा संकल्प

अमरावती13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म चळवळीला गतिमान करण्यासाठी व भारत बौद्धमय करण्यासाठी सोमवार १२ रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात जागतिक धम्म महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने गगन मलिक फाउंडेशनच्या वतीने १११ बुद्ध मूर्तीचे वितरण करण्यात आले. चित्रपट अभिनेता गगन मलिक यांनी भारत बौद्धमय करण्याच्या अनुषंगाने देशात ८४ हजार बुद्ध मूर्तीचे वितरण करण्याचा संकल्प केला आहे.

धम्म महोत्सवाच्या प्रथम सत्रात महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाथेरो भदंत बुद्धघोष तर उद्घाटक म्हणून महाथेरो धम्मसेन उपस्थित होते. तसेच यावेळी भदंत महाथेरो सत्यानंद, थेरो आनंद, थेरो करुणाशिल, भदंत आर्यासारीपुत्त, भदंत सुभद्र, भदंत धिरधम्म, भदंत दिपंकर, भदंत बुद्धप्रिय, भन्ते सुंमन्नो, भन्ते शिलरत्न, भन्ते वंजीराबोधी यांच्यासह मोठ्या संख्येने भिक्खू संघ उपस्थित होते. यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये उद्घाटक म्हणून लेडी गव्हर्नर कमल गवई, आ.बळवंत वानखडे, अॅड. पी.एस. खडसे, किशोर बोरकर, मधुकर अभ्यंकर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी भगवान बुद्ध व मानवी अधिकार या विषयावर मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रात व्हिएतनामचे भदंत थिच बिन्ह ताम हे उद्घाटक तर अध्यक्षस्थानी भदंत मापंत महास्थवीर, बुद्धमुर्ती दानदाते तथा प्रसिद्ध फिल्म अभिनेता गगन मलिक उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते १११ बुद्धमुर्तीचे वितरण करण्यात आले. तसेच ८४ हजार बुद्ध मूर्तींचे वाटप करून भारत बुद्धमय करण्याचा संकल्प घेण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन जगदिश गोवर्धन यांनी केले. कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने बुद्ध अनुयायी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...