आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिवंगत सोमेश्वर पुसतकर यांच्या नावे लोक फाउंडेशनच्या वतीने दिल्या जाणारा‘लोकगौरव पुरस्कार- २०२२’ मंगळवारी (दि. २) श्री. संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलला प्रदान करण्यात येणार आहे. एक लाख रुपये, मानपत्र व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या ऑडिटोरियममध्ये सायंकाळी ५ वाजता आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ नेते प्रा. बी. टी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली, ‘वनराई’ नागपूरचे विश्वस्त गिरीश गांधी, पत्रकार व वक्ते बाळासाहेब कुलकर्णी, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य, कार्याध्यक्ष डॉ. रमेश गोडबोले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे .
सोमेश्वर पुसतकर यांनी आपल्या हयातीत शेकडो गरजू लोकांना मदत केली. समाजातील वेगवेगळ्या घटकांना कायम ताकत देण्याचे काम केले आहे. पुसतकर यांच्या कार्याचा वारसा चालत राहावा आणि त्यांच्यासारखा काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना बळ मिळावे, यासाठी लोक फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी पुसतकर यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या नावे लोक गौरव पुरस्कार देण्यात येतो.
२०२२ च्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या श्री. संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलने आजवर हजारो हृदयरुग्णांवर माफक शुल्कात उपचार केले आहेत. गोरगरीब हृदयरुग्णांवर वाजवी दरात उपचार व्हावे, यासाठी साने गुरुजी मानव सेवा संघाच्या माध्यमातून श्री. संत अच्युत महाराजांनी २००६ मध्ये या हार्ट हॉस्पिटलची उभारणी केली होती. २००६ पर्यंत बाराशे रुग्णांना मुंबई येथे विविध रुग्णालयांमध्ये हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी आर्थिक मदत या संस्थेने केली.
प्रतिव्यक्ती एक वीट, रुपये १० असा निधी संकलित करण्यात आला व अमरावतीतील मार्डी मार्गावर एका निर्जन जागेवर साडेचार एकर जमिनीवर हार्ट हॉस्पिटलची इमारत उभारण्यात आली. हॉस्पिटलच्या उभारणीपासून हजारो हृदयरुग्णांवर येथे विविध उपचार केले गेले आहेत. जुलै २००६ रोजी अमरावती विभागातील पहिली ऐतिहासिक ओपन हार्ट सर्जरी करण्याचा मान या हार्ट हॉस्पिटल ला प्राप्त झाला आहे. सध्या हॉस्पिटलमध्ये बायपास, अँजिओग्प्लास्टी, अँजिओग्राफी आदी शस्त्रक्रिया अतिशय कमी दरात केल्या जातात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.