आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औषधीसाठा:पावसाळ्यापूर्वी जिल्हा आरोग्य विभाग सतर्क ; जिल्ह्यातील पुरामुळे संपर्क तुटलेल्या गावांना वेळेत पोहचणार औषधीसाठा

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळा तोंडावर आला आहे. परंतु, महापुराच्या काळात जिल्ह्यातील २७ गावांचा इतर गावांशी संपर्क तुटतो. त्यामुळे या गावांना वाहने पाठवता येत नाहीत. म्हणूनच या गावांमध्ये आतापासूनच औषधांचा पुरवठा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाभागामार्फत करण्यात येत आहे. मेळघाटातील धारणी व चिखलदरा या दोन तालुक्यांमधील २७ आदिवासीबहुल गावांचा पावसाळ्यात पुरामुळे संपर्क तुटतो. या गावांमधील ग्रामस्थांच्या आरोग्याची आरोग्य विभागाला पावसाळ्यात अधिक काळजी घ्यावी लागते. त्यामुळे या ठिकाणी आधीच ग्रामस्थांना पुरेल एवढा औषधसाठा पाठवला जात आहे. साथरोग व अन्य आजाराची आवश्यक औषधे यात आहेत. ती आरोग्य केंद्रातून पुरवली जाणार आहेत. पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याचा धोका असतो. तसेच ताप, थंडीचे रुग्ण वाढण्याची शक्यता असते. पावसाळ्यात येणाऱ्या पुरामुळे अमरावती जिल्ह्यातील धारणी व चिखलदरा या तालुक्यातील गावांचा संपर्क तुटतो, त्यामुळे या काळात आरोग्य सेवा पुरवणे हा प्रश्न जिल्हा प्रशासन आरोग्य विभागाला असतो. यात कोरडाढाणा, झिलांगपाटी, कोकमार, भादूबल्डा, डोमी, टपालखेडा, डोलार, कुही, कुंड, कुटीदा, चोपण, कींन्हीखेडा, परसोली, चेथर, धाराकोट, तातरा, मारिता, भुतरुम, राक्षा, बोराट्याखेड, सुमीता, कारजखेडा, रेहट्याखेडा, पांढराखडक, बीच्छुखेडा, माडी झडप आदी गावांचा समावेश आहे. तत्पूर्वी मेळ घाटातील या दोन्ही तालुक्यामध्ये ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ही गावे येतात, त्या आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य सेवक, आरोग्यसेविका, आशा कर्मचारी यांच्या माध्यमातून ही औषधे सोपवून पावसाळा संपेपर्यंत पुरेल एवढा साठा केला जाणार आहे. यासोबतच जि.प. आरोग्य विभागाकडे रुग्णवाहिकांची कमतरता नाही. नव्याने अत्याधुनिक रुग्णवाहिका आल्या आहेत. तसेच जुन्या रुग्णवाहिका सज्ज आहे. याशिवाय १०८ रुग्णवाहिका ही सज्ज आहेत.

पावसाळ्याआधीच सर्व उपाययोजना केल्या जातात ^पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दुर्गम भागाचा दौरा करून पाहणी केली. त्यामुळे पावसाळ्या आधीच सर्व उपाययोजना केल्या जात आहे. आरोग्य विभागाकडून आवश्यक औषधांचा आधीच पुरवठा करण्याचे काम सुरू आहे. -डॉ.दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी, अमरावती.

बातम्या आणखी आहेत...