आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान:जिल्ह्याला ‘अवकाळी’चा फटका; मेळघाटात‎ गारपीट‎

अमरावती‎6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेळघाटातील विदर्भाचे नंदनवन असलेल्या‎ चिखलदरा तालुक्यातील काही भागात‎ शनिवारी (दि. १८) सायंकाळी साडेपाचच्या‎ सुमारास अवकाळी पावसाने तडाखा दिला‎ असून, पावसासह गारपिटही झाल्याने‎ वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.‎ तालुक्यातील मोथा, आमझरी यासह चुर्णी‎ परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने‎ त्याचा फटका रब्बी पिकांना बसला आहे.‎ जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील‎ पळसखेड शिवारात गहू, हरभरा, संत्रा अशा‎ अनेक पिकांचा मोठे नुकसान झाल्यामुळे‎ शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे.‎

मेळघाटातील दुर्गम डोंगराळ भागात‎ गारपीट व अवकाळी पाऊस झाल्यामुळे‎ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून,‎ अनेक ठिकाणी गारांचा खच तयार झाला‎ होता. तालुक्यातील चुनखडी, खडीमल या‎ भागात मोठ्या प्रमाणात गारपीट होऊन रब्बी‎ पिकाचे नुकसान झाले आहे.‎ दरम्यान,अमरावती शहरातही शनिवारी‎ सायंकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास‎ तुरळक पाऊस झाला तर काही भागात‎ गारपीट झाली.

बातम्या आणखी आहेत...