आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ऑरेंज सिटी मराठी संपादक व पत्रकार सोसायटी वरुड व इन्स्टिट्यूट ऑफ स्टडीज महाविद्यालय (जनसंवाद व पत्रकारिता विद्या विभाग) यांच्या संयुक्त सहकार्याने शनिवारी (दि. ७) वरुड येथील अष्टविनायक सभागृह येथे पत्रकार स्व. नेमीचंदजी शाह स्मृती जिल्हास्तरीय पत्रकार मेळावा तथा पुरस्कार वितरण समारंभाचे सकाळी अकरा वाजता आयोजन करण्यात आले आहे.
समारंभाचे उद््घाटन खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रामदास तडस असतील. विशेष अतिथी म्हणून आमदार देवेंद्र भुयार, माजी आमदार नरेश चंद्र ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहीते उपस्थित राहतील.
या प्रसंगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहतील. कार्यक्रमाला आमदार अॅड. किरण सरनाईक, आमदार डॉ. रणजित पाटील, ताज खाँ, शैलेश अग्रवाल, गिरीश कराळे, राजेंद्र आंडे, विक्रम ठाकरे, वरुड युवा व्यापारी संघाचे अध्यक्ष लोकेश अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती राहील. या प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले नरेंद्र खंडेलवाल, मोरेश्वर वानखडे, डॉ. भुषण खोले, रामदास कडू, संजय खासबागे, प्रवीण कुंडलकर, धैर्य आजनकर, रुहीका वडवाले, गार्गी भोंडे, चंद्रकांत भड यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. मोठ्या संख्येने नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.