आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • District Level T20 Cricket Tournament Begins; In The Morning Fight, Buldana Won, Amravati Won With A Penetrating Hit By Parag Gandhi |marathi News

दिव्य मराठी विशेष:जिल्हास्तर टी-20 क्रिकेट स्पर्धेला सुरुवात; सकाळच्या लढतीत बुलडाणा विजयी, पराग गांधीच्या भेदक माऱ्याने अमरावती विजयी

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विदर्भ क्रिकेट संघटनेद्वारे तसेच जिल्हा हौशी क्रिकेट संघटना, अमरावतीच्या यजमानपदाखाली एचव्हीपीएम क्रिकेट स्टेडियमवर ३ एप्रिलपासून सुरू झालेल्या जिल्हास्तरीय टी-२० क्रिकेट स्पर्धेत अमरावतीने सामनावीर गोलंदाज पराग गांधीने भेदक माऱ्यासह घेतलेल्या चार बळींच्या आधारे यवतमाळला १० धावांनी पराभूत करून विजयी सलामी दिली. तर त्याआधी सकाळच्या सत्रात झालेल्या पहिल्या सामन्यात बुलडाण्याने चंद्रपूरला ६ धावांनी नमवले. अमरावतीत प्रथमच आयोजित टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सामन्यात अमरावती संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ फलंदाज गमावून १४१ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात २० षटकांत ९ बाद १३१ धावांपर्यंत मजल मारली.

अमरावतीचा आयपीएल खेळाडू व रणजीपटू अपूर्व वानखडेने ३५ चेंडूत ४८ धावांची वेगवान खेळी केली. पीयूष खोपेने २५ तर विशेष तिवारीने १५ धावा ठोकल्या. यवतमाळकडून संजय सिंग पनवरने ३ तर सिद्धेश नेराल व पुष्पक गुजरने प्रत्येकी दोन बळी घेतले. प्रत्युत्तरात यवतमाळकडून केदार जगतापने ४ चौकारांसह २७ तर पुष्पक गुजरने २२ धावा केल्या. अमरावतीचा फिरकीपटू पराग गांधीने ३ षटकांत २० धावांत ४ बळी घेतले. तसेच अंकुश नावलकरने ४ षटकांत २३ धावा देत ३ फलंदाज बाद केले. पहिल्या सामन्यात बुलडाणा संघाने प्रथम फलंदाजी करताना सामनावीर आवेश शेखची अर्धशतकी ६० धावांची खेळी तसेच सौरभ ठुब्रिकर, संकेत बिंगेवार यांच्या प्रत्येकी २५ धावांच्या योगदानामुळे बुलडाणा संघाने २० षटकांत सर्वबाद १५० धावा उभारल्या. चंद्रपूरकडून ऋषभ राठोडने ३ तर दिग्विजय देशमुख व मेहूल शेगावकर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

प्रत्युत्तरात चंद्रपूरने १९.१ षटकांत सर्वबाद १४४ धावा केल्या. नदीम शेखने २७, षण्मेश देशमुखने २८ धावा केल्या. बुलडाण्याचे गोलंदाज सुनिकेत बिंगेवार, संकेत गावंडे, यशराज हजारी यांनी प्रत्येकी २ फलंदाज बाद केले.

माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू प्रशांत वैद्यच्या उपस्थितीत उद्घाटन
सकाळी ९ वाजेच्या सुमारास माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू प्रशांत वैद्य यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी व्हीसीएचे सचिव हेमंत गांधी, पदाधिकारी शरद पाध्ये, माजी रणजीपटू सुहास फडकर, अमरावती जिल्हा हौशी क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष अॅड. प्रशांत देशपांडे, सचिव प्रा. दिनानाथ नवाथे, डॉ. अजयपाल उपाध्याय, संदीप संघई, अनिरुद्ध देशपांडे, प्रशिक्षक आल्हाद लोखंडे यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले. उपस्थितांनी क्रिकेटपटूंना शुभेच्छा देत त्यांचे उत्साहवर्धन केले.

बातम्या आणखी आहेत...