आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजुनी पेन्शन योजना हा आमचा हक्क असून तो मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. सरकार वेगवेगळ्या पद्धतीने पेन्शन नाकारण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आपल्याला अधिक संघटितपणे या मुद्द्याचा विचार करावा लागेल. त्यासाठी अमरावतीच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, नव्हे अमरावतीचा पुढाकार हाच इतर जिल्ह्यांसाठी आदर्श ठरेल, अशी कृती होईलच, याची मला खात्री आहे, असा विश्वास संघटनेचे राज्य अध्यक्ष गिरीश दाभाळकर यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य जि.प. लिपिकवर्गीय संघटनेच्या जिल्हा शाखेतर्फे आयोजित कर्मचाऱ्यांचा एक मेळावा त्यांच्याच अध्यक्षतेखाली पार पडला. अतुल मंगल कार्यालयात आयोजित या मेळाव्यात त्यांनी हे आवाहन केले. जिल्हास्तरीय मेळावा तथा दिनदर्शिका- 2023 चे लोकार्पण आणि गुणवंतांचा सत्कार असे या कार्यक्रमाचे स्वरुप होते. यावेळी राज्याचे कार्याध्यक्ष संजय घोटे, विभागीय अध्यक्ष अशोक डहाणे, विभागीय सचिव मारोतराव जाधव, राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष पंकज गुल्हाने, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य दिनेश राऊत, इतर पदाधिकारी अनिल बालवाडे, दीपक दुबे, महिला आघाडीच्या विभागीय संघटक किरणताई खांडेकर, दिनेश राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान सेवानिवृत्त कर्मचारी, पदोन्नत कर्मचारी आणि गुणवंत कामगार पुरस्काराचे विजेते असलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान विष्णुपंत भुजाडे, प्रदीप देशमुख, किरणताई खांडेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा सचिव संजय राठी, हेमंतकुमार जायले, राजेश रोंघे, श्रीकांत मेश्राम, विजय उपरीकर, गजानन कोरडे, दिनेश लांबाडे, मंगेश मानकर, अंकुश पवार, श्रीकांत सदाफळे, विजय कविटकर, नितिन माहोरे, संजय गोहत्रे, निशांत तायडे, किरण खांडेकर, वैशाली गड़ेकर, अपर्णा आत्राम, मनिषा अंधारे, दीपाली पडोळे, ईश्वर राठोड, दिनेश राऊत, अर्चना मानकर, समिर लेंडे, गोपाल होले, वंदना भुरभुरे, प्रिती दिवाण, प्रितम सातंगे आदींनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.