आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्घाटन:ऑक्सिजनबाबत जिल्हा स्वयंपूर्ण होणार : ठाकूर, संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन निर्मिती संयंत्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

अमरावती9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय स्तरावर ऑक्सिजन प्रणाली, व्हेंटिलेटर्स, आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्धता केली जात आहे. श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल व रिसर्च इन्स्टिट्यूट येथे उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन निर्मिती सयंत्रामुळे ऑक्सिजन बाबत जिल्हा स्वयंपूर्ण होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

मार्डी रोड येथील श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल व रिसर्च इन्स्टिट्यूट येथे ऑक्सिजन निर्मिती संयंत्राचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स ॲड इंडस्ट्रीचे महासचिव सौरभ सन्याल, ह.भ.प. सचिनदेव महाराज, संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. अनिल सावरकर, सुरेश जोशी यावेळी उपस्थित होते.

कोरोना काळात संकटाचा सामना करण्यासाठी राज्यात अल्पावधीत आरोग्य सुविधांचा मोठा विस्तार करण्यात आला. ऑक्सिजन बाबत जिल्हा स्वयंपूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल येथे ऑक्सिजन सयंत्र स्थापन करण्यात आले आहे. यामुळे एकाचवेळी शंभर रुग्णांना ऑक्सिजन पुरविणे शक्य होणार आहे. कोरोना संकट काळातील अडचणींवर आपण अथक प्रयत्नातून मात केली आहे.

जिल्ह्यात आरोग्य विषयक विविध सुविधांची वेगाने निर्मिती करण्यावर भर देण्यात येत आहे. रुग्णालये, प्रयोगशाळा, ऑक्सिजन निर्मिती सयंत्र, लसीकरण मोहिम अशा विविध गोष्टींना चालना देण्यात येत आहे. भविष्यात आरोग्य संकटाची संभाव्यता लक्षात घेऊन खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्याप्रमाणे प्रत्येक ग्रामस्तरावरही ऑक्सिजनदृष्ट्या स्वयंपूर्ण बनविण्यावर भर देण्यात येईल, असे पालकमंत्री यावेळी म्हणाल्या. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या विशेष प्रयत्नाने व पुढाकाराने संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलला ऑक्सिजन निर्मिती सयंत्र मिळण्यास मदत झाली. त्यामुळे पालकमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांचे यावेळी आभार मानले. अॅड. ठाकूर यांनी यावेळी ऑक्सिजननिर्मिती सयंत्राची पाहणी केली. तसेच रुग्णालयाच्या डॉक्टरांशी चर्चा करुन उपचार यंत्रणेचा आढावा घेतला व आवश्यक सुविधांबाबत माहिती घेतली.

ह.भ.प. सचिन देव महाराज यांनी संस्थेला १ लाख १४ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. इतरांनीही आरोग्य सेवेसाठी मदत करण्याचे आवाहन सन्याल यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर दिवे यांनी सूत्रसंचालन संस्थेचे सचिव सागर पासेबंद यांनी तर आभार प्रदर्शन कोषाध्यक्ष मुकुंद वाईकर यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...