आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मेजर ध्यानचंद इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत ‘एचव्हीपीएम’च्या शालेय कुस्तीपटूंनी विविध वजन गटात एकूण १२ सुवर्णपदकांची लूट करून कुस्ती या खेळातील अमरावतीचे वर्चस्व कायम राखले. ‘एचव्हीपीएम’च्या पहिलवानांनी या स्पर्धेत मुले व मुलींच्या गटात १२ सुवर्ण आणि १५ रौप्य पदकांनी झोळी भरली. सुवर्ण विजेत्या सर्व कुस्तीगिरांची निवड शालेय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी झाली आहे. या स्पर्धेत अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशीम, अकोला जिल्ह्यांतील सुमारे ५०० शालेय पहिलवानांनी मुले व मुलींच्या गटात सहभाग नोंदवला.
श्री ह.व्या.प्र.मंडळात सराव करणाऱ्या शालेय कुस्तीपटूंमध्ये १४ वर्षांखालील ३५ किलो वजन गटात ओंकार उघडेने सुवर्णपदक जिंकले. ४१किलो गटात पीयूष ढेडवालने सोनेरी पदकावर ताबा मिळवला. मुलींच्या ३३ किलो गटात लक्ष्मी कुरुडेने विजेतेपद पटकावले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.