आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इम्पॅक्ट:महावितरणचे कर्मचारीही म्हणतात, मान्सूनपूर्व कामे अपूर्णच मुख्य अभियंत्यांना साकडे

अमरावती12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महावितरणच्या मान्सूनपूर्व तयारीचा पुरता बोजवारा उडाल्याचे निरीक्षण खुद्द महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी नोंदविले असून या कामासाठी कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे आठवड्यातून एक दिवसाची मोकळीक द्यावी, अशी मागणी एमएसइ वर्कर्स फेडरेशनने केली आहे.

‘मान्सूनपूर्व तयारीचा बोजवारा : महत्वाची सरकारी कार्यालयेसुद्धा दुर्लक्षित - रस्त्यावरील सताड उघड्या डीबी नागरिकांसाठी अति धोकादायक !’ या शिर्षकाखाली आज, सोमवार, 20 जूनच्या अंकात ‘दिव्य मराठी’ने सविस्तर ग्राऊंड रिपोर्ट प्रकाशित केला. त्याची दखल घेत एमएसइ वर्कर्स फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आज दुपारी अधीक्षक अभियंत्यांना निवेदन सादर केले. अमरावती परिमंडळाअंतर्गत ‘प्री मान्सून मेंटनन्स’ या सदराखाली पावसाळ्याआधी विजवाहिनी व विद्युत प्रणालीची देखभाल तथा दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करणे गरजेचे होते. मात्र ती कामे केली गेली नाहीत, असे वर्कर्स फेडरेशनच्या निवेदनात नमूद आहे.

फेडरेशनचे झोनल सचिव महेश जाधव यांच्या नेतृत्वात देण्यात आलेल्या या निवेदनापूर्वी अनेकदा संबंधित अधिका-यांशी लेखी निवेदनासह प्रत्यक्ष चर्चाही झाल्या. चर्चेअंती लेखी आश्वासनसुध्दा संघटनेला मिळाले. परंतू अजूनही त्यावर अंमल झाला नाही, असेही अधीक्षक अभियंत्यांच्या लक्षात आणून देण्यात आले. पावसाळा सुरु होऊनही ठरल्याप्रमाणे विज बाहिनी व प्रणालीची देखभाल दुरुस्ती, त्याचबरोबर ट्री कटिंग इत्यादी कामे झालेली नाहीत. केवळ कागदोपत्री कामे झाल्याचे दाखवल्या जात आहे. पूर्वी आठवड्यातून एक दिवस (राखीव) म्हणून विज वाहिन्यांच्या मेंटनन्सकरीता कर्मचाऱ्यांना दिला जात होता, असा स्पष्ट उल्लेख या निवेदनात करण्यात आला आहे. थोडक्यात विज वाहिन्यांच्या देखभाल व दुरुस्तीला दुय्यम स्थान देण्याचे प्रशासनाचे अलिखीत धोरण असल्याचा संघटनेचा आरोप आहे.

मेन्टेनन्स शून्य पण वसुलीसाठी तगादा

सद्यस्थितीत थकीत विज बिल वसुली सक्तीने राबविण्याचे धोरण प्रशासनाकडून सुरु आहे. त्याकरीता कर्मचाऱ्यांना राबविल्याही जात आहे. विज बिल वसुली योग्य प्रमाणात न झाल्यास प्रसंगी कर्मचाऱ्यांना दंडात्मक, निलंबन व बडतर्फीच्या कारवाईची भीतीही दाखवण्यात येत आहे. काही भागात तशा कारवायासुध्दा सुरु आहेत. परंतु कर्मचाऱ्यांना मेन्टेनन्सकरीता वेळ देण्यात येत नाही, असे खेदाने नमुद करावे लागत आहे. असे एमएसइ वर्कर्स फेडरेशन झोनल सचिव महेश जाधव यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...