आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी)नागपुरातील डाॅक्टरांच्या मदतीशिवाय स्थानिक तज्ज्ञ डाॅक्टरांनी प्रथमच मूत्रपिंड (किडनी) प्रत्यारोपण यशस्वी केले. आईची किडनी ही तरुण मुलाच्या शरीरात प्रत्यारोपित करून त्याला जीवदान दिले. सध्या आई व तिच्या मुलाची प्रकृती उत्तम आहे. विशेष बाब अशी की, राज्य शासनाच्या ‘महात्मा फुले जन आरोग्य’ योजनेअंतर्गत ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खिरसाना येथील किरण अशोक नंदागवळी या मातेने त्यांच्या मुलाला एक मूत्रपिंड दान करून जीवनदान दिले. अत्यंत गरीब कुटुंबातील तसेच वडिलांचे छत्र हरपलेला सोमेश्वर नंदागवळी हा २४ वर्षांचा तरुण मागील अडीच वर्षापासून डॉ. अविनाश चौधरी यांच्याकडे उपचार व डायलिसिसवर होता. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्याला सुपर स्पेशालिटी येथे दाखल करण्यात आले. आरोग्य उपसंचालक डॉ. तरंग तुषारवारे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे, विशेष कार्य अधिकारी डॉ. नीलेश पाचबुद्धे यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनात ही शस्त्रक्रिया केली.
यावेळी नागपूर येथील वैद्यकीय चमूची मदत न घेता रुग्णालयाचे डॉ. उमेश अग्रवाल, डॉ. राहुल पोटोडे, डॉ. विक्रम देशमुख, डॉ. राहुल घुले, डॉ. विशाल बाहेकर, डॉ. सुधीर धांडे यांनी सर्जन म्हणून, तर नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. अविनाश चौधरी, डॉ. प्रणित काकडे, डॉ. स्वप्नील मोलके, डॉ. हितेश गुल्हाने यांनी व बधिरीकरण तज्ज्ञ म्हणून डॉ. जफर अली, डॉ. प्रणीत घोनमोडे, डॉ. पौर्णिमा वानखडे, डॉ. बाळकृष्ण बागवाले, डॉ. रोहित हातगावकर
१५वे यशस्वी प्रत्यारोपण
सुपर स्पेशालिटीत आतापर्यंत मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या १५ शस्त्रक्रिया झाल्या. यातील १४ शस्त्रक्रिया या नागपुरातील तज्ज्ञ डाॅक्टरांच्या मदतीने पूर्ण झाल्या. मात्र, प्रथमच १५ वे प्रत्यारोपण हे यशस्वीपणे अमरावतील डाॅक्टरांनी केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.