आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 दिवसात 16 जणांना चावले श्वान!:अंजनगाव सुर्जीत मोकाट कुत्र्यांचा वावर, लवकर आवर घाला, मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

अमरावती7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून दोन दिवसात तब्बल 16 जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची बाब समोर आली आहे. या संदर्भात बाळासाहेबांची शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले असून त्यांनी येथील ग्रामीण रुग्णालयात माहिती घेवून नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना भेटून ज्यावर उपाय योजना करण्याची मागणी केली. कारवाई न झाल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

शहरात फिरणारी मोकाट कुत्री आता पादचाऱ्यांच्या थेट चावा घेत असल्याचे प्रकरणे शहरात मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यावर आळा बसावा म्हणून या कुत्र्यांना जेरबंद करण्याची जबाबदारी नगर पालिकेची असताना पालिकेकडून कुठल्याही उपाय योजना आखल्या जात असल्याचे दिसून येत नाही गेल्या. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. दोन दिवसात शहरात तब्बल सोळा जणांना चवताळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला असल्याची माहिती मिळाली असून येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांना प्रतिबंधक लसही देण्यात आल्या आहेत.

येथील एकनाथ शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेनेचे शहराध्यक्ष मुन्ना इसोकर यांना माहिती मिळताच त्यांनी ग्रामीण रुग्णालय गाठले असता त्यांना ही माहिती मिळाली. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह थेट नगर पालिकेचे मुख्याधिकारी सुमेध अलोने यांची भेट घेवून या चवताळलेल्या कुत्र्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. कारवाई न झाल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

मॉर्निंग वॉक करणाऱ्यांमध्ये भीती

आपल्या आरोग्याची निगा राखण्यासाठी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्या शहरात अधिक आहे. भल्या पहाटे अंधार असल्याने या फिरायला जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर ही मोकाट कुत्री अंगावर धावून येत असल्याचे प्रसंग घडत आहेत. त्यामुळे सकाळी फिरायला जणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कुत्रा चावणे ही घातक बाब

दोन दिवसात 16 रुग्णांना कुत्र्यांना चावा घेतल्याने त्यांना प्रतिबंधक लस टोचल्यात. शहरातील मोकाट कुत्र्यांवर आळा घालणे ही नगर परिषदेची जबाबदारी आहे. सध्या कुत्र्यांवर विविध आजारांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ही बाब घातक आहे. नागरिकांनीही योग्य ती काळजी घेत कुत्रा चावल्यास त्वरित प्रतिबंध लस टोचून घ्यावी. - डॉ. अमोल नालट, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, अं. सु.

बातम्या आणखी आहेत...