आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराव्यावसायिक सिलिंडरच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढल्यामुळे व्यावसायिक प्रतिष्ठानांनी घरगुती सिलिंडरचा म्हणजे १४.२ किलोच्या सिलिंडरचा व्यवसायासाठी सर्रास वापर सुरू केला आहे. काही ठिकाणी तर १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरमध्ये १४.२ किलोच्या सिलिंडरमधील गॅस भरण्याचेही प्रकार होत असल्याचे दिसत आहे. सोबतच वाहनांमध्येही सर्रास घरगुती सिलिंडरचा वापर होत असल्याचे दिसत आहे. यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. तरी शासनाने या विरुद्ध तातडीने कारवाई करावी अशी मागणी ग्राहक भारती स्वयंसेवी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. ग्राहक भारती स्वयंसेवी संस्थेचे युवा उपाध्यक्ष नितीन सोळंके यांनी पत्रपरिषदेतून याबाबत मागणी केली. नितीन सोळंके पत्रकार परिषदेत म्हणाले, की ग्राहक भारती या संस्थेच्या माध्यमातून लोक जागरणाची एक देशव्यापी चळवळ सुरू करण्यात आली असून या गंभीर विषयावर तोडगा काढण्यासाठी समाजातील सर्वच घटकांचा सहभाग एकत्रित करण्याचे प्रयत्न केले जात आहे. या सर्व गैरप्रकाराला कारण म्हणजे काळाबाजार करणाऱ्यांना थोडे जास्त पैसे दिले, तर बाजारात घरगुती सिलिंडर अवैधरीत्या सहज उपलब्ध होत आहे. तर काही गॅस एजन्सीज डमी ग्राहकांच्या नावाने नोंदणी करून तेल कंपन्यांकडून जास्तीचे सिलिंडर घेत काळाबाजार करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या पत्रकार परिषदेत शुभम रंगारी, प्रशांत जामगळे, जयंत रॉय, शुभांक सिंह आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.