आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजोपयोगी संकल्पना:‘एक मुठ्ठी अनाज’ उपक्रमातून चार क्विंटल धान्य ‘प्रश्नचिन्ह’साठी दान; तक्षशिला महाविद्यालयातील प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांनी राबविली समाजोपयोगी संकल्पना

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गरजुंना मदत व्हावी, तसेच विद्यार्थ्यांमध्ये दानाची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित तक्षशिला महाविद्यालयातील डॉ. अंजली वाठ यांच्या संकल्पनेतून ‘एक मुठ्ठी अनाज’ हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमातून गोळा झालेले ४ क्विंटल धान्य मंगरूळ चव्हाळा येथील मतीन भोसले यांच्या प्रश्नचिन्ह आश्रम शाळेला दान म्हणून देण्यात आले.

डॉ. वाठ यांच्या संकल्पनेतून मागील तीन वर्षांपासून महाविद्यालया द्वारे हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्याला जमेल तसे धान्य आपापल्या परीनुसार गोळा केले. या उपक्रमाद्वारे गोळा झालेले दोन क्विंटल गहू, दोन क्विंटल तांदूळ पारधी समुदायातील शाळाबाह्य मुलांना निवासी शिक्षण देणाऱ्या प्रश्नचिन्ह आश्रम शाळेला देण्यात आले आले. तक्षशिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मल्लू पडवाल, मराठी विभागप्रमुख डॉ. कमलाकर पायस, प्रा. प्रवीण वानखडे, प्रा. प्रीतेश पाटील यांनी स्वत: मंगरूळ चव्हाळा येथील प्रश्नचिन्ह आश्रमशाळेत जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली.

या वेळी आश्रम शाळेचे संस्थापक मतीन भोसले यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. या प्रसंगी येथील विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त गुणांचे प्रदर्शन करून उपस्थितांची मने जिंकली. महाविद्यालयातील उपस्थित सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांशी हितगुज करून त्यांची आपुलकीने चौकशी केली. या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आई डॉ. कमल गवई, अध्यक्ष किर्ती अर्जुन, सचिव प्रा. पी. आर. एस. राव यांनी आश्रम शाळेचे संस्थापक मतीन भोसले यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...